Thursday, February 24, 2022

आमच एक बर होतं
आम्ही जायचो तेच मुळी
"नाही" च्या तयारीनं 

अभ्यास न केलेल्या 
 विद्यार्थ्य‍ाने जावे जसे 
आपटायच्या  तयारीनं

तिथे आपटणे नक्की असायचे 
पण ते ही असायचे 
तिकीट लॉटरीचे 

निकाल लागे पर्यंत 
मनातल्या मनात 
लाडू खायचे


Wednesday, December 29, 2021

ज्ञानेश्वरी अध्याय पहिला । ओवी १ ते ५ भावार्थ सहित

ज्ञानेश्वरी अध्याय पहिला 

साभार आंतरजालावरून (हे महतकार्य कुणाचे माहीत नाही.)

ओवी १ ते ५ भावार्थ सहित

ॐ नमो जी आद्या । वेद प्रतिपाद्या ।जय जय स्वसंवेद्या । आत्मरूपा ॥ १ ॥
ॐकार हाच परमात्मा आहे असे कल्पून ज्ञानदेवांनी मंगल केले आहे.) हे सर्वांचे मूळ असणार्‍या व वेदांच्या प्रतिपादनाचा विषय असाणार्‍या ॐकारा, तुला नमस्कार असो. व स्वत: स्वत:ला जाणण्यास योग्य असणार्‍या आणि सर्वव्यापी अशा आत्मरूपी ॐकारा तुझा जयजयकार असो. ॥१-१॥

 देवा तूंचि गणेशु ।सकलार्थमतिप्रकाशु ।म्हणे निवृत्तिदासु । अवधारिजो जी ॥ २ ॥
वरील विशेषणांनी युक्त अशा) देवा, सर्वांच्या बुद्धीचा प्रकाश जो गणेश तो तूच आहेस. निवृत्तिनाथांचे शिष्य (ज्ञानेश्वर महाराज) म्हणतात, महाराज ऐका. ॥१-२॥

 हें शब्दब्रह्म अशेष । तेचि मूर्ति सुवेष ।जेथ वर्णवपु निर्दोष । मिरवत असे ॥ ३ ॥
संपूर्ण वेद हीच त्या (त्या गणपतीची) उत्तम सजवलेली मूर्ती आहे, आणि तिच्या ठिकाणी निर्दोष वर्णरूपी सौंदर्य खुलून राहिले आहे. ॥१-३॥

स्मृति तेचि अवयव । देखा
आंगीक भाव ।तेथ लावण्याची ठेव । अर्थशोभा ॥ ४ ॥
आता (त्या गणपतीच्या) शरीराची ठेवण पहा. (मन्वादिकांच्या स्मृति हेच त्याचे अवयव होत. त्या स्मृतीतील अर्थसौंदर्याने (ते अवयव म्हणजे लावण्याची केवळ खाणच बनले आहेत. ॥१-४॥

अष्टादश पुराणें । तींचि मणिभूषणें ।पदपद्धति खेवणें । प्रमेयरत्‍नांचीं ॥ ५ ॥
अठरा पुराणे हेच (त्याच्या) अंगवरील रत्नखचित अलंकार आहेत. त्यात प्रतिपादलेली तत्वे हीच रत्ने व छंदोबद्ध शब्द हीच त्यांची कोंदणे होत. ॥१-५॥

क्रमशः

Thursday, August 29, 2019

नवे लेखन

प्रिय मित्र हो . 
आता अमृतानुभव सुरु करीत आहे .हा ग्रंथ अधिक कठीण आहे .म्हणुन अभ्यास करताना तो जसा समजला तसा  पद्यात लिहण्याचा मानस आहे .कर्ता करविते श्री गुरू ज्ञानदेव आणि परात्पर गुरू श्री दत्तात्रेय आहेत .
त्यासाठी अमृतानुभव अभ्यास हा ब्लोग व फेसबुक पेज सुरू करणार आहे. 
लोभ असावा हि विनंति .
आपला विक्रांत 

Saturday, June 15, 2019

ज्ञानेश्वरी अध्याय १८ वा.ओव्या १७९४ ते १८११ पसायदान.



ज्ञानेश्वरी / अध्याय अठरावा / संत ज्ञानेश्वर

ओव्या १७९४ ते  १८११ पसायदान

आतां विश्वात्मकें देवें | येणें वाग्यज्ञें तोषावें |
तोषोनि मज द्यावें | पसायदान हें ॥ १७९४ ॥

जे खळांची व्यंकटी सांडो | तयां सत्कर्मीं रती वाढो |
भूतां परस्परें पडो | मैत्र जीवाचें ॥ १७९५ ॥
खळांची=दुष्ट  व्यंकटी=वाकडेपणा दुष्टता

दुरिताचें तिमिर जावो | विश्व स्वधर्मसूर्यें पाहो |
जो जें वांछील तो तें लाहो | प्राणिजात ॥ १७९६ ॥
दुरिताचें=पातक   लाहो=मिळो

वर्षत सकळमंगळीं | ईश्वरनिष्ठांची मांदियाळी |
अनवरत भूमंडळीं | भेटतु भूतां ॥ १७९७ ॥
सकळमंगळीं =सर्व मांगल्याचा मांदियाळी=समूह
अनवरत=सतत

चलां कल्पतरूंचे अरव | चेतना चिंतामणीचें गांव |
बोलते जे अर्णव | पीयूषाचे ॥ १७९८ ॥
चलां=चालते अरव=बाग चेतना=सजीव अर्णव=शब्द   
पीयूषाचे=अमृताचे

चंद्रमे जे अलांछन | मार्तंड जे तापहीन |
ते सर्वांही सदा सज्जन | सोयरे होतु ॥ १७९९ ॥
अलांछन=दाग नसलेले मार्तंड=सूर्य सोयरे=नातेवाईक

किंबहुना सर्वसुखीं | पूर्ण होऊनि तिहीं लोकीं |
भजिजो आदिपुरुखीं | अखंडित ॥ १८०० ॥

आणि ग्रंथोपजीविये | विशेषीं लोकींयें |
दृष्टादृष्ट विजयें | होआवें जी ॥ १८०१ ॥
ग्रंथोपजीविये=ग्रंथ हा जीवन झालेल्या
दृष्टादृष्ट=दृष्ट व अदृष्ट, इहपर लोक

तेथ म्हणे श्रीविश्वेशरावो | हा होईल दानपसावो |
येणें वरें ज्ञानदेवो | सुखिया झाला ॥ १८०२ ॥

ऐसें युगीं परी कळीं | आणि महाराष्ट्रमंडळीं |
श्रीगोदावरीच्या कूलीं | दक्षिणलिंगीं ॥ १८०३ ॥

त्रिभुवनैकपवित्र | अनादि पंचक्रोश क्षेत्र |
जेथ जगाचें जीवनसूत्र | श्रीमहालया असे ॥ १८०४ ॥
श्रीमहालया=मोहिनी अवतार
 
तेथ यदुवंशविलासु | जो सकळकळानिवासु |
न्यायातें पोषी क्षितीशु | श्रीरामचंद्रु ॥ १८०५ ॥
क्षितीशु=धरेला

तेथ महेशान्वयसंभूतें | श्रीनिवृत्तिनाथसुतें |
केलें ज्ञानदेवें गीते | देशीकार लेणें ॥ १८०६ ॥
महेशान्वयसंभूतें=शिवापासून निघलेल्या विद्याकुलात जन्मलेला

एवं भारताच्या गांवीं | भीष्मनाम प्रसिद्ध पर्वीं |
श्रीकृष्णार्जुनीं बरवी | गोठी जे केली ॥ १८०७ ॥
भारताच्या=महाभारत

जें उपनिषदांचें सार | सर्व शास्त्रांचें माहेर |
परमहंसीं सरोवर | सेविजे जें ॥ १८०८ ॥

तियें गीतेचा कलशु | संपूर्ण हा अष्टादशु |
म्हणे निवृत्तिदासु | ज्ञानदेवो ॥ १८०९ ॥
संपूर्ण=पूर्ण झाला

पुढती पुढती पुढती | इया ग्रंथपुण्यसंपत्ती |
सर्वसुखीं सर्वभूतीं | संपूर्ण होईजे ॥ १८१० ॥
पुढती=पुन्हा

शके बाराशतें बारोत्तरें | तैं टीका केली ज्ञानेश्वरें |
सच्चिदानंदबाबा आदरें | लेखकु जाहला ॥ १८११ ॥
बाराशतें बारोत्तरें =१२१२

इति श्री ज्ञानदेवविरचितायां भावार्थदीपिकायां अष्टादशोध्यायः ॥

श्रीशके पंधराशें साहोत्तरीं | तारणनामसंवत्सरीं |
एकाजनार्दनें अत्यादरीं | गीता\-ज्ञानेश्वरी प्रतिशुद्ध केली ॥ १ ॥

ग्रंथ पूर्वींच अतिशुद्ध | परी पाठांतरीं शुद्ध अबद्ध |
तो शोधूनियां एवंविध | प्रतिशुद्ध सिद्धज्ञानेश्वरी ॥ २ ॥

नमो ज्ञानेश्वरा निष्कलंका | जयाची गीतेची वाचितां टीका |
ज्ञान होय लोकां | अतिभाविकां ग्रंथार्थियां ॥ ३ ॥

बहुकाळपर्वणी गोमटी | भाद्रपदमास कपिलाषष्ठी |
प्रतिष्ठानीं गोदातटीं | लेखनकामाठी संपूर्ण जाली ॥ ४ ॥

ज्ञानेश्वरीपाठीं | जो ओंवी करील मऱ्हाटी |
तेणें अमृताचे ताटीं | जाण नरोटी ठेविली ॥ ५ ॥
॥ श्रीकृष्णार्पणमस्तु ॥
॥ शुभं भवतु ॥
॥ श्री परमात्मने नमः ॥
॥ तत्सत् ब्रह्मार्पणमस्तु ॥
  **********************  *********** ******************

Monday, June 10, 2019

ज्ञानेश्वरी अध्याय १८ वा ओव्या १७३० ते १७९४




ज्ञानेश्वरी / अध्याय अठरावा / संत ज्ञानेश्वर

ओव्या १७३० ते  १७९४

आतां आयती गीता जगीं | मी सांगें मऱ्हाठिया भंगीं |
येथ कें विस्मयालागीं | ठावो आहे ॥ १७३० ॥

श्रीगुरुचेनि नांवें माती | डोंगरीं जयापासीं होती |
तेणें कोळियें त्रिजगतीं | येकवद केली ॥ १७३१ ॥
माती=मूर्ती    कोळियें=एकलव्य येकवद=कीर्ती

चंदनें वेधलीं झाडें | जालीं चंदनाचेनि पाडें |
वसिष्ठें मांनिली, कीं भांडे | भानूसीं शाटी ॥ १७३२ ॥
भांडे=भांडते (स्पर्धा करते)     शाटी=छाटी

मा मी तव चित्ताथिला | आणि श्रीगुरु ऐसा दादुला |
जो दिठीवेनि आपुला | बैसवी पदीं ॥ १७३३ ॥
चित्ताथिला=चित्त संपन्न    दादुला=श्रेष्ठ

आधींचि देखणी दिठी | वरी सूर्य पुरवी पाठी |
तैं न दिसे ऐसी गोठी | केंही आहे ? ॥ १७३४ ॥
देखणी =निर्दोष  सूर्य =पाठी उभे असणे

म्हणौनि माझें नित्य नवे | श्वासोश्वासही प्रबंध होआवे |
श्रीगुरुकृपा काय नोहे | ज्ञानदेवो म्हणे ॥ १७३५ ॥
प्रबंध=काव्य ग्रंथ

याकारणें मियां | श्रीगीतार्थु मऱ्हाठिया |
केला लोकां यया | दिठीचा विषो ॥ १७३६ ॥

परी मऱ्हाठे बोलरंगें | कवळितां पैं गीतांगें |
तैं गातयाचेनि पांगें | ये काढतां नोहे ॥ १७३७ ॥
गीतांगें =गीतेची पदे   पैं=जर   तैं=तेव्हा जर
पांगें =कमतरता उणीव

म्हणौनि गीता गावों म्हणे | तें गाणिवें होती लेणें |
ना मोकळे तरी उणें | गीताही आणित ॥ १७३८ ॥
गाणिवें=गाण्याला    मोकळे तरी= न गाता  वाचली
उणें=मागे सारणे

सुंदर आंगीं लेणें न सूये | तैं तो मोकळा शृंगारु होये |
ना लेइलें तरी आहे | तैसें कें उचित ? ॥ १७३९ ॥
सूये=घालणे   

कां मोतियांची जैसी जाती | सोनयाही मान देती |
नातरी मानविती | अंगेंचि सडीं ॥ १७४० ॥
मानविती=शोभती

नाना गुंफिलीं कां मोकळीं | उणीं न होती परीमळीं |
वसंतागमींचीं वाटोळीं | मोगरीं जैसीं ॥ १७४१ ॥

तैसा गाणिवेतें मिरवी | गीतेवीणही रंगु दावीं |
तो लाभाचा प्रबंधु ओंवी | केला मियां ॥ १७४२ ॥
गीतेवीणही=न गाता ही

तेणें आबालसुबोधें | ओवीयेचेनि प्रबंधें |
ब्रह्मरससुस्वादें | अक्षरें गुंथिलीं ॥ १७४३ ॥
 
आतां चंदनाच्या तरुवरीं | परीमळालागीं फुलवरीं |
पारुखणें जियापरी | लागेना कीं ॥ १७४४ ॥
पारुखणें=थांबणे
 
तैसा प्रबंधु हा श्रवणीं | लागतखेंवो समाधि आणी |
ऐकिलियाही वाखाणी | काय व्यसन न लवी ? ॥ १७४५ ॥

पाठ करितां व्याजें | पांडित्यें येती वेषजे |
तैं अमृतातें नेणिजे | फावलिया ॥ १७४६ ॥
व्याजें =हौसेने    वेषजे=अलंकृत करते

तैसेंनि आइतेपणें | कवित्व जालें हें उपेणें |
मनन निदिध्यास, श्रवणें | जिंतिलें आतां ॥ १७४७ ॥
आइतेपणें=सहज   उपेणें=विश्रांति स्थान

हे स्वानंदभोगाची सेल | भलतयसीचि देईल |
सर्वेंद्रियां पोषवील | श्रवणाकरवीं ॥ १७४८ ॥
सेल=मुख्य भाग भलतयसी=चांगला

चंद्रातें आंगवणें | भोगूनि चकोर शाहाणे |
परी फावे जैसें चांदिणें | भलतयाही ॥ १७४९ ॥
आंगवणें=अंगाणे स्वत:

तैसें अध्यात्मशास्त्रीं यिये | अंतरंगचि अधिकारिये |
परी लोकु वाक्चातुर्यें | होईल सुखिया ॥ १७५० ॥

ऐसें श्रीनिवृत्तिनाथाचें | गौरव आहे जी साचें |
ग्रंथु नोहे हें कृपेचें | वैभव तिये ॥ १७५१ ॥

क्षीरसिंधु परिसरीं | शक्तीच्या कर्णकुहरीं |
नेणों कैं श्रीत्रिपुरारीं | सांगितलें जें ॥ १७५२ ॥

तें क्षीरकल्लोळाआंतु | मकरोदरीं गुप्तु |
होता तयाचा हातु | पैठें जालें ॥ १७५३ ॥

तो मत्स्येंद्र सप्तशृंगीं | भग्नावयवा चौरंगी |
भेटला कीं तो सर्वांगीं | संपूर्ण जाला ॥ १७५४ ॥

मग समाधि अव्युत्थया | भोगावी वासना यया |
ते मुद्रा श्रीगोरक्षराया | दिधली मीनीं ॥ १७५५ ॥
अव्युत्थया =अखंड   मीनीं=माछिंद्र नाथ

तेणें योगाब्जिनीसरोवरु | विषयविध्वंसैकवीरु |
तिये पदीं कां सर्वेश्वरु | अभिषेकिला ॥ १७५६ ॥
योगाब्जिनी=योगरूपी कमळ  

मग तिहीं तें शांभव | अद्वयानंदवैभव |
संपादिलें सप्रभव | श्रीगहिनीनाथा ॥ १७५७ ॥
शांभव=शैवागामी शिवाकडुन प्राप्त

तेणें कळिकळितु भूतां | आला देखोनि निरुता |
ते आज्ञा श्रीनिवृत्तिनाथा | दिधली ऐसी ॥ १७५८ ॥
कळिकळितु= कली काळा शिणले   निरुता=स्पष्ट

ना आदिगुरु शंकरा\- | लागोनि शिष्यपरंपरा |
बोधाचा हा संसरा | जाला जो आमुतें ॥ १७५९ ॥
संसरा=लाभ

तो हा तूं घेऊनि आघवा | कळीं गिळितयां जीवां |
सर्व प्रकारीं धांवा | करीं पां वेगीं ॥ १७६० ॥
धांवा  करीं=मदत कर

आधींच तंव तो कृपाळु | वरी गुरुआज्ञेचा बोलू |
जाला जैसा वर्षाकाळू | खवळणें मेघां ॥ १७६१ ॥

मग आर्ताचेनि वोरसें | गीतार्थग्रंथनमिसें |
वर्षला शांतरसें | तो हा ग्रंथु ॥ १७६२ ॥
वोरसें=करुणा प्रेम  नमिसें=निमित्ते

तेथ पुढां मी बापिया | मांडला आर्ती आपुलिया |
कीं यासाठीं येवढिया | आणिलों यशा ॥ १७६३ ॥
बापिया=चातकपक्षी  आर्ती =उत्कंठा  

एवं गुरुक्रमें लाधलें | समाधिधन जें आपुलें |
तें ग्रंथें बोधौनि दिधलें | गोसावी मज ॥ १७६४ ॥

वांचूनि पढे ना वाची | ना सेवाही जाणें स्वामीची |
ऐशिया मज ग्रंथाची | योग्यता कें असे ? ॥ १७६५ ॥

परी साचचि गुरुनाथें | निमित्त करूनि मातें |
प्रबंधव्याजें जगातें | रक्षिलें जाणा ॥ १७६६ ॥

तऱ्ही पुरोहितगुणें | मी बोलिलों पुरें उणें |
तें तुम्हीं माउलीपणें | उपसाहिजो जी ॥ १७६७ ॥

शब्द कैसा घडिजे | प्रमेयीं कैसें पां चढिजें |
अळंकारु म्हणिजे | काय तें नेणें ॥ १७६८ ॥
प्रमेयीं=तत्वर्थ

सायिखडेयाचें बाहुलें | चालवित्या सूत्राचेनि चाले |
तैसा मातें दावीत बोले | स्वामी तो माझा ॥ १७६९ ॥

यालागीं मी गुणदोष\- | विषीं क्षमाविना विशेष |
जे मी संजात ग्रंथलों देख | आचार्यें कीं ॥ १७७० ॥
संजात =प्रेरित केला क्षमाविना=क्षमा नको

आणि तुम्हां संतांचिये सभे | जें उणीवेंसी ठाके उभें |
तें पूर्ण नोहे तरी तैं लोभें | तुम्हांसीचि कोपें ॥ १७७१ ॥
कोपें=बोल येईल
(तुमच्यावरील प्रेमानेच वाढवता येईल)

सिवतलियाही परीसें | लोहत्वाचिये अवदसे |
न मुकिजे आयसें | तैं कवणा बोलु | ॥ १७७२ ॥
लोहत्वा=लोखंड अवदसे=खालची स्थिति आयसें=सहज

वोहळें हेंचि करावें | जे गंगेचें आंग ठाकावें |
मगही गंगा जरी नोहावें | तैं तो काय करी ? ॥ १७७३ ॥

म्हणौनि भाग्ययोगें बहुवें | तुम्हां संतांचें मी पाये |
पातलों आतां कें लाहे | उणें जगीं | ॥ १७७४ ॥

अहो जी माझेनि स्वामी | मज संत जोडुनि तुम्हीं |
दिधलेति तेणें सर्वकामीं | परीपूर्ण जालों ॥ १७७५ ॥

पाहा पां मातें तुम्हां सांगडें | माहेर तेणें सुरवाडें |
ग्रंथाचें आळियाडें | सिद्धी गेलें ॥ १७७६ ॥
सांगडें =सारखे सुरवाडें =सुखावतो आळियाडें =हट्ट

जी कनकाचें निखळ | वोतूं येईल भूमंडळ |
चिंतारत्नी कुळाचळ | निर्मूं येती ॥ १७७७ ॥
कुळाचळ=डोंगर

सातांही हो सागरांतें | सोपें भरितां अमृतें |
दुवाड नोहे तारांतें | चंद्र करितां ॥ १७७८ ॥
 दुवाड=कठीण

कल्पतरूचे आराम | लावितां नाहीं विषम |
परी गीतार्थाचें वर्म | निवडूं न ये ॥ १७७९ ॥
आराम=बाग   विषम=त्रास

तो मी येकु सर्व मुका | बोलोनि मऱ्हाठिया भाखा |
करी, डोळेवरी लोकां | घेवों ये ऐसें जें ॥ १७८० ॥
डोळेवरी=डोळ्यांनी
 
हा ग्रंथसागरु येव्हढा | उतरोनि पैलीकडा |
कीर्तिविजयाचा धेंडा | नाचे जो कां ॥ १७८१ ॥

गीतार्थाचा आवारु | कलशेंसीं महामेरु |
रचूनि माजीं श्रीगुरु\- | लिंग जें पूजीं ॥ १७८२ ॥

गीता निष्कपट माय | चुकोनि तान्हें हिंडे जें वाय |
तें मायपूता भेटी होय | हा धर्म तुमचा ॥ १७८३ ॥

तुम्हां सज्जनांचें केलें | आकळुनी जी मी बोलें |
ज्ञानदेव म्हणे थेंकुलें | तैसें नोहें ॥ १७८४ ॥
केलें =उपकार    थेंकुलें=क्षुल्लक

काय बहु बोलों सकळां | मेळविलों जन्मफळा |
ग्रंथसिद्धीचा सोहळा | दाविला जो हा ॥ १७८५ ॥

मियां जैसजैसिया आशा | केला तुमचा भरंवसा |
ते पुरवूनि जी बहुवसा | आणिलों सुखा ॥ १७८६ ॥
बहुवसा=सर्व

मजलागीं ग्रंथाची स्वामी | दुजीं सृष्टी जे हे केली तुम्ही |
तें पाहोनि हांसों आम्हीं | विश्वामित्रातेंही ॥ १७८७ ॥

जे असोनि त्रिशंकुदोषें | धातयाही आणावें वोसें |
तें नासतें, कीजे कीं ऐसें | निर्मावें नाहीं ॥ १७८८ ॥
वोसें =कमीपणा     निर्मावें=नाशवंत नाही (हा ग्रंथ )

शंभू उपमन्युचेनि मोहें | क्षीरसागरूही केला आहे |
येथ तोही उपमे सरी नोहे | जे विषगर्भ कीं ॥ १७८९ ॥
विषगर्भ=पोती विष असलेला

अंधकारु निशाचरां | गिळितां, सूर्यें चराचरां |
धांवा केला, तरी खरा | ताउनी कीं तो ॥ १७९० ॥
ताउनी=तप्त
तातलियाही जगाकारणें | चंद्रें वेंचिलें चांदणें |
तया सदोषा केवीं म्हणे | सारिखें हें ॥ १७९१ ॥
सदोषा=(कला असल्याने) दोष युक्त

म्हणौनि तुम्हीं मज संतीं | ग्रंथरूप जो हा त्रिजगतीं |
उपयोग केला तो पुढती | निरुपम जी ॥ १७९२ ॥

किंबहुना तुमचें केलें | धर्मकीर्तन हें सिद्धी नेलें |
येथ माझें जी उरलें | पाईकपण ॥ १७९३ ॥

by dr. vikrant tikone