Wednesday, September 19, 2018

ज्ञानेश्वरी अध्याय १८ वा, ओव्या १ ते १० मोक्षसंज्ञासयोगः


 

ज्ञानेश्वरी / अध्याय अठरावा / संत ज्ञानेश्वर

ओव्या १ ते १०


॥ ॐ श्री परमात्मने नमः ॥
॥ अथ श्रीमद्भगवद्गीता ॥
। अष्टादशोऽध्यायः - अध्याय अठरावा |
। मोक्षसंज्ञासयोगः।

जयजय देव निर्मळ | निजजनाखिलमंगळ |
जन्मजराजलदजाळ | प्रभंजन ॥ १ ॥
निज=आपली जन= लोक खिलमंगळा=सर्व मंगळ मंगला करणारा
जरा=वृद्धपण जलद= मेघ  जाळ= समूह
प्रभंजन=वायु

जयजय देव प्रबळ | विदळितामंगळकुळ |
निगमागमद्रुमफळ | फलप्रद ॥ २ ॥

विदळिता=नाश करणारा  मंगळ =अमंगळ  
निगम+वेद गम =शास्त्रे  द्रुमफळ=वृक्षाचे फळ

जयजय देव सकल | विगतविषयवत्सल |
कलितकाळकौतूहल | कलातीत ॥ ३ ॥

विगतविषय=विषय दूर अथवा नष्ट  केलेल्या साठी वत्सल  
कलित काळकौतूहल =अंकित काळक्रीडा       कलातीत=परिपूर्ण

जयजय देव निश्चळ | चलितचित्तपानतुंदिल |
जगदुन्मीलनाविरल | केलिप्रिय ॥ ४ ॥

निश्चळ =स्थिर
चलितचित्तपानतुंदिल चंचल चित्ताचे पान करून दोंद पुष्ट
जगदुन्मीलना=जगत उत्पत्ति विरल=अखंड   केलिप्रिय=क्रीडाप्रिय

जयजय देव निष्कळ | स्फुरदमंदानंदबहळ |
नित्यनिरस्ताखिलमळ | मूळभूत ॥ ५ ॥

निष्कळ = निष्कपट  स्फुरदमंदानंद= स्वयंप्रकाशने स्फुरीत होणारा आनंद
बहळ=विपुल
नित्य=सदा निरस्त =नाश करणारा खिलमळ=सर्व मळ   
मूळभूत=जगताचे मूळ आधार अधिष्ठान

जयजय देव स्वप्रभ | जगदंबुदगर्भनभ |
भुवनोद्भवारंभस्तंभ | भवध्वंस ॥ ६ ॥

जगदंबुदगर्भनभ =जगतरूपी मेघाचे जे गर्भ आकाश   
भुवनोद्भवारंभस्तंभ=जगत उद्भव आरंभचा खांब
भवध्वंस=संसार नाश करणारा

जयजय देव विशुद्ध | विदुदयोद्यानद्विरद |
शमदम\-मदनमदभेद | दयार्णव ॥ ७ ॥
विदुदयोद्यानद्विरद=ज्ञानाच्या अरण्यातील (अविद्यारूपी)हत्ती चा विनाश करणारा
शमदम= या साधनेने  

जयजय देवैकरूप | अतिकृतकंदर्पसर्पदर्प |
भक्तभावभुवनदीप | तापापह ॥ ८ ॥

देवैकरूप=भेदरहित, एकरूप
अतिकृत= हरण करणारा कंदर्प= मदन   सर्पदर्प =सर्पाचा गर्व
तापापह=ताप विनाशक

जयजय देव अद्वितीय | परीणतोपरमैकप्रिय |
निजजनजित भजनीय | मायागम्य ॥ ९ ॥

परीणतो=विवेकी पवित्र विरागी पुरूषांना
परमैकप्रिय=परम प्रिय
निजजनजित=भक्त वश

जयजय देव श्रीगुरो | अकल्पनाख्यकल्पतरो |
स्वसंविद्रुमबीजप्ररो | हणावनी ॥ १० ॥
अकल्पनाख्य=ज्याची कपल्णा करता येत नाही अश्या
(निर्विकल्प ब्रह्मप्राप्तीकरून) देणारा  कल्पवृक्ष
स्वसंविद्रुमबीज=आत्मज्ञान रूपी वृक्षाचे बीज
प्ररो- | हणावनी=उत्पती स्थान (रुजवायची जागा )_

**********************************************
by dr. vikrant tikone

No comments:

Post a Comment