ज्ञानेश्वरी / अध्याय अठरावा / संत ज्ञानेश्वर
ओव्या १३४१ ते १३८९
ओव्या १३४१ ते १३८९
सर्वगुह्यतमं भूयः शृणु मे परमं वचः।
इष्टोऽसि मे दृढमिति ततो वक्ष्यामि ते हितम् ॥ ६४॥
(सर्व गुहयातील गुह्य उत्तम वाक्य मी पुन्हा सांगत आहे ,तू माझा अतिशय आवडता आहे म्हणून तुझ्या हिताची गोष्ट तुला मी सांगतो .)
तरी अवधान पघळ | करूनिया आणिक येक वेळ |
वाक्य माझें निर्मळ | अवधारीं पां ॥ १३४१ ॥
पघळ=प्रबळ
हें वाच्य म्हणौनि बोलिजे | कां श्राव्य मग आयिकिजे |
तैसें नव्हें परी तुझें | भाग्य बरवें ॥ १३४२ ॥
कूर्मीचिया पिलियां | दिठी पान्हा ये धनंजया |
कां आकाश वाहे बापिया | घरींचें पाणी ॥ १३४३ ॥
बापिया=चातक पक्षी
जो व्यवहारु जेथ न घडे | तयाचें फळचि तेथ जोडे |
काय दैवें न सांपडे | सानुकूळें ? ॥ १३४४ ॥
येऱ्हवीं द्वैताची वारी | सारूनि ऐक्याच्या परीवरीं |
भोगिजे तें अवधारीं | रहस्य हें ॥ १३४५ ॥
आणि निरुपचारा प्रेमा | विषय होय जें प्रियोत्तमा |
तें दुजें नव्हे कीं आत्मा | ऐसेंचि जाणावें ॥ १३४६ ॥
आरिसाचिया देखिलया | गोमटें कीजे धनंजया |
तें तया, नोहे आपणयां | लागीं जैसें ॥ १३४७ ॥
देखिलया =पाहण्या करता गोमटें=स्वच्छ
तैसें पार्था तुझेनि मिषें | मी बोलें आपणयाचि उद्देशें |
माझ्या तुझ्या ठाईं असे | मीतूंपण गा ॥ १३४८ ॥
म्हणौनि जिव्हारींचें गुज | सांगतसे जीवासी तुज |
हें अनन्यगतीचें मज | आथी व्यसन ॥ १३४९ ॥
पै जळा आपणपें देतां | लवण भुललें पंडुसुता |
कीं आघवें तयाचें होतां | न लजेचि तें ॥ १३५० ॥
तैसा तूं माझ्या ठाईं | राखों नेणसीचि कांहीं |
तरी आतां तुज काई | गोप्य मी करूं ? ॥ १३५१ ॥
म्हणौनि आघवींचि गूढें | जें पाऊनि, अति उघडें |
तें गोप्य, माझें चोखडें | वाक्य आइक ॥ १३५२ ॥
पाऊनि= मिळता उघडें= उलगडणारे
मन्मना भव मद्भक्तो मद्याजी मां नमस्कुरु।
मामेवैष्यसि सत्यं ते प्रतिजाने प्रियोऽसि मे ॥ ६५॥
माझे ठायी मन ठेव ,माझा भक्त हो माझे यजन कर मला नमस्कार कर
मंजे तू मला येवून मिलशिल हेसत्य
प्रतिज्ञे ने तुला सांगतो कारण तू माझा प्रिय भक्त आहेस
तरी बाह्य आणि अंतरा | आपुलिया सर्व व्यापारा |
मज व्यापकातें वीरा | विषयो करीं ॥ १३५३ ॥
आघवा आंगीं जैसा | वायु मिळोनि आहे आकाशा |
तूं सर्व कर्मीं तैसा | मजसींचि आस ॥ १३५४ ॥
किंबहुना आपुलें मन | करीं माझें एकायतन |
माझेनि श्रवणें कान | भरूनि घालीं ॥ १३५५ ॥
एकायतन=घर
आत्मज्ञानें चोखडीं | संत जे माझीं रूपडीं |
तेथ दृष्टि पडो आवडी | कामिनी जैसी ॥ १३५६ ॥
मीं सर्व वस्तीचें वसौटें | माझीं नामें जियें चोखटें |
तियें जियावया वाटे | वाचेचिये लावीं ॥ १३५७ ॥
वसौटें=आश्रय स्थान
जियावया
वाटे =अंतकरणात
उतरावी म्हणून
हातांचें करणें | कां पायांचें चालणें |
तें होय मजकारणें | तैसें करीं ॥ १३५८ ॥
आपुला अथवा परावा | ठायीं उपकरसी पांडवा |
तेणें यज्ञें होईं बरवा | याज्ञिकु माझा ॥ १३५९ ॥
हें एकैक शिकऊं काई | पैं सेवकें आपुल्या ठाईं |
उरूनि, येर सर्वही | मी सेव्यचि करीं ॥ १३६० ॥
सेवकें=सेवकत्व
तेथ जाऊनिया भूतद्वेषु | सर्वत्र नमवैन मीचि एकु |
ऐसेनि आश्रयो आत्यंतिकु | लाहसी तूं माझा ॥ १३६१ ॥
मग भरलेया जगाआंतु | जाऊनि तिजयाची मातु |
होऊनि ठायील एकांतु | आम्हां तुम्हां ॥ १३६२ ॥
तेव्हां भलतिये आवस्थे | मी तूतें तूं मातें |
भोगिसी ऐसें आइतें | वाढेल सुख ॥ १३६३ ॥
आणि तिजें आडळ करितें | निमालें अर्जुना जेथें |
तें मीचि म्हणौनि तूं मातें | पावसी शेखीं ॥ १३६४ ॥
जैसी जळींची प्रतिभा | जळनाशीं बिंबा |
येतां गाभागोभा | कांहीं आहे ? ॥ १३६५ ॥
गाभागोभा =अडचण
पैं पवनु अंबरा | कां कल्लोळु सागरा |
मिळतां आडवारा | कोणाचा गा ? ॥ १३६६ ॥
म्हणौनि तूं आणि आम्हीं | हें दिसताहे देहधर्मीं |
मग ययाच्या विरामीं | मीचि होसी ॥ १३६७ ॥
यया बोलामाझारीं | होय नव्हे झणें करीं |
येथ आन आथी तरी | तुझीचि आण ॥ १३६८ ॥
झणें
करीं =नको
करू आन आथी=वेगळे असेल तर
पैं तुझी आण वाहणें | हें आत्मलिंगातें शिवणें |
प्रीतीची जाति लाजणें | आठवों नेदी ॥ १३६९ ॥
येऱ्हवीं वेद्यु निष्प्रपंचु | जेणें विश्वाभासु हा साचु |
आज्ञेचा नटनाचु | काळातें जिणें ॥ १३७० ॥
वेद्यु=ज्ञांनाचा विषय निष्प्रपंचुप्रपंच नसलेला
नटनाचु=सामर्थ्य
तो देवो मी सत्यसंकल्पु | आणि जगाच्या हितीं बापु |
मा आणेचा आक्षेपु | कां करावा ? ॥ १३७१ ॥
आणेचा=शपथेचा
परी अर्जुना तुझेनि वेधें | मियां देवपणाचीं बिरुदें |
सांडिलीं गा, मी हे आधें | सगळेनि तुवां ॥ १३७२ ॥
आधें =½ अपूर्ण होतो सगळेनि=पूर्णत्व तुझ्यामुळे
पैं काजा आपुलिया | रावो आपुली आपणया |
आण वाहे धनंजया | तैसें हें कीं ॥ १३७३ ॥
तेथ अर्जुनु म्हणे देवें | अचाट हें न बोलावें |
जे आमचें काज नांवें | तुझेनि एके ॥ १३७४ ॥
काज=कार्य होते
यावरी सांगों बैससी | कां सांगतां भाषही देसी |
या तुझिया विनोदासी | पारु आहे जी ? ॥ १३७५ ॥
विनोदासी =लीलेला
प्रेमाला पारु=पाड
कमळवना विकाशु | करी रवीचा एक अंशु |
तेथ आघवाचि प्रकाशु | नित्य दे तो ॥ १३७६ ॥
पृथ्वी निवऊनि सागर | भरीजती येवढें थोर |
वर्षे तेथ मिषांतर | चातकु कीं ॥ १३७७ ॥
मिषांतर=कारण
म्हणौनि औदार्या तुझेया | मज निमित्त ना, म्हणावया |
प्राप्ति असे दानीराया | कृपानिधी ॥ १३७८ ॥
तंव देवो म्हणती राहें | या बोलाचा प्रस्तावो नोहे |
पैं मातें पावसी उपायें | साचचि येणें ॥ १३७९ ॥
प्रस्तावो=प्रसंग
सैंधव सिंधू पडलिया | जो क्षणु धनंजया |
तेणें विरेचि कीं उरावया | कारण कायी ? ॥ १३८० ॥
तैसें सर्वत्र मातें भजतां | सर्व मी होतां अहंता |
निःशेष जाऊनि तत्वता | मीचि होसी ॥ १३८१ ॥
एवं माझिये प्राप्तीवरी | कर्मालागोनि अवधारीं |
दाविली तुज उजरी | उपायांची ॥ १३८२ ॥
उजरी=स्पष्टता
जे आधीं तंव पंडुसुता | सर्व कर्में मज अर्पितां |
सर्वत्र प्रसन्नता | लाहिजे माझी ॥ १३८३ ॥
पाठीं माझ्या इये प्रसादीं | माझें ज्ञान जाय सिद्धी |
तेणें मिसळिजे त्रिशुद्धी | स्वरूपीं माझ्या ॥ १३८४ ॥
मग पार्था तिये ठायीं | साध्य साधन होय नाहीं |
किंबहुना तुज कांहीं | उरेचि ना ॥ १३८५ ॥
तरी सर्व कर्में आपलीं | तुवां सर्वदा मज अर्पिलीं |
तेणें प्रसन्नता लाधली | आजि हे माझी ॥ १३८६ ॥
म्हणौनि येणें प्रसादबळें | नव्हे झुंजाचेनि आडळें |
न ठाकेचि येकवेळे | भाळलों तुज ॥ १३८७ ॥
प्रसादबळें =प्रसन्नता
ठाकेचि=आड येणे आडळें =अडथळा
जेणें सप्रपंच अज्ञान जाये | एकु मी गोचरु होये |
तें उपपत्तीचेनि उपायें | गीतारूप हें ॥ १३८८ ॥
मियां ज्ञान तुज आपुलें | नानापरी उपदेशिलें |
येणें अज्ञानजात सांडी वियालें | धर्माधर्म जें ॥ १३८९ ॥
by dr. vikrant tikone
***************************************************
No comments:
Post a Comment