ज्ञानेश्वरी / अध्याय अठरावा / संत ज्ञानेश्वर
ओव्या ७३३ ते
७७१ त्रिविध धृती
धृत्या यया धारयते मनःप्राणेन्द्रियक्रियाः।
योगेनाव्यभिचारिण्या धृतिः सा पार्थ सात्त्विकी ॥ ३३॥
(मन प्राण इंद्रिय क्रिया व्यापार चालावी ,अव्यभिचारी योगाने )
तरी उदेलिया दिनकरु | चोरीसिं थोके अंधारु |
कां राजाज्ञा अव्यवहारु | कुंठवी जेवीं ॥ ७३३ ॥
तरी उदेलिया दिनकरु | चोरीसिं थोके अंधारु |
कां राजाज्ञा अव्यवहारु | कुंठवी जेवीं ॥ ७३३ ॥
चोरीसिं
थोके =चोरी
(सवेत अंधार) बंद होणे
नाना पवनाचा साटु | वाजीनलिया नीटु |
आंगेंसीं बोभाटु | सांडिती मेघ ॥ ७३४ ॥
साटु=वेग वाजीनलिया=वाढताच
बोभाटु=आवाज करत
कां अगस्तीचेनि दर्शनें | सिंधु घेऊनि ठाती मौनें |
चंद्रोदयीं कमळवनें | मिठी देती ॥ ७३५ ॥
मिठी=मिटणे
हें असो पावो उचलिला | मदमुख न ठेविती खालां |
गर्जोनि पुढां जाला | सिंहु जरी ॥ ७३६ ॥
मदमुख=मदमस्त हत्ती
तैसा जो धीरु | उठलिया अंतरु |
मनादिकें व्यापारु | सांडिती उभीं ॥ ७३७ ॥
इंद्रियां विषयांचिया गांठी | अपैसया सुटती किरीटी |
मन मायेच्या पोटीं | रिगती दाही ॥ ७३८ ॥
मन
मायेच्या=मन रूपी आईच्या
दाही=दशेंद्रिये
अधोर्ध्व गूढें काढी | प्राण नवांची पेंडी |
बांधोनि घाली उडी | मध्यमेमाजीं ॥ ७३९ ॥
अधोर्ध्व
=वर प्राण व खाली अपान
गूढें
काढी =अवरोध करून
प्राण
नवांची=नव वायु सह
पेंडी=गाठोडी
संकल्पविकल्पांचें लुगडे | सांडूनि मन उघडें |
बुद्धि मागिलेकडे | उगीचि बैसे ॥ ७४० ॥
ऐसी धैर्यराजें जेणें | मन प्राण करणें |
स्वचेष्टांचीं संभाषणें | सांडविजती ॥ ७४१ ॥
करणें=इंद्रिये स्वचेष्टांचीं संभाषणें =स्वत:चे व्यापार
मग आघवींचि सडीं | ध्यानाच्या आंतुल्या मढीं |
कोंडिजती निरवडी | योगाचिये ॥ ७४२ ॥
सडीं=मोकळी मढीं=कोठडीत
परी परमात्मया चक्रवर्ती | उगाणिती जंव हातीं |
तंव लांचु न घेतां धृती | धरिजती जिया ॥ ७४३ ॥
उगाणिती=स्वाधीन होणे (जाणणे ) जंव=जोवर
तंव=तोवर
ते गा धृती येथें | सात्विक हें निरुतें |
आईक अर्जुनातें | श्रीकांतु म्हणे ॥ ७४४ ॥
यया तु धर्मकामार्थान्धृत्या धारयतेऽर्जुन।
प्रसण्गेन फलाकाण्क्षी धृतिः सा पार्थ राजसी ॥ ३४॥
धर्म अर्थ काम जी धृती धारण करते फळ आकांशा धरते त्या प्रसंगी ती राजस
आणि होऊनियां शरीरी | स्वर्गसंसाराच्या दोहीं घरीं |
नांदे जो पोटभरी | त्रिवर्गोपायें ॥ ७४५ ॥
त्रिवर्गोपायें= धर्म अर्थ काम पोटभरी=सुख मानून
तो मनोरथांच्या सागरीं | धर्मार्थकामांच्या तारुवावरी |
जेणें धैर्यबळें करी | क्रिया\-वणिज ॥ ७४६ ॥
तारुवावरी=बोटी
जें कर्म भांडवला सूये | तयाची चौगुणी येती पाहे |
येवढें सायास साहे | जया धृती ॥ ७४७ ॥
सूये=घालणे चौगुणी=चौपट फळ
ते गा धृती राजस | पार्था येथ परीयेस |
आतां आइक तामस | तिसरी जे कां ॥ ७४८ ॥
यया स्वप्नं भयं शोकं विषादं मदमेव च।
न विमुञ्चति दुर्मेधा धृतिः सा पार्थ तामसी ॥ ३५॥
तरी सर्वाधमें गुणें | जयाचें कां रूपा येणें |
कोळसा काळेपणें | घडला जैसा ॥ ७४९ ॥
सर्वाधमें=सर्व अधम
अहो प्राकृत आणि हीनु | तयाही कीं गुणत्वाचा मानु |
तरी न म्हणिजे पुण्यजनु | राक्षसु काई ?॥ ७५० ॥
गुणत्वाचा=इथे गुण शब्द वापरला म्हणून
पैं ग्रहांमाजीं इंगळु | तयातें म्हणिजे मंगळु |
तैसा तमीं धसाळु | गुणशब्दु हा ॥ ७५१ ॥
इंगळु=आग धसाळु=व्यर्थ ठिसुळ
जे सर्वदोषांचा वसौटा | तमचि कामऊनि सुभटा |
उभारिला आंगवठा | जया नराचा ॥ ७५२ ॥
वसौटा=मुक्काम कामऊनि=उपयोगा आणून
तो आळसु सूनि असे कांखे | म्हणौनि निद्रे कहीं न मुके |
पापें पोषितां दुःखें | न सांडिजे जेवीं ॥ ७५३ ॥
सूनि=धरणे
आणि देहधनाचिया आवडी | सदा भय तयातें न सांडी |
विसंबूं न सके धोंडीं | काठिण्य जैसें ॥ ७५४ ॥
आणि पदार्थजातीं स्नेहो | बांधे म्हणौनि तो शोकें ठावो |
केला न शके पाप जावों | कृतघ्नौनि जैसें ॥ ७५५ ॥
आणि असंतोष जीवेंसीं | धरूनि ठेला अहर्निशीं |
म्हणौनि मैत्री तेणेंसीं | विषादें केली ॥ ७५६ ॥
लसणातें न सांडी गंधी | कां अपथ्यशीळातें व्याधी |
तैसी केली मरणावधी | विषादें तया ॥ ७५७ ॥
मरणावधी=मरे पर्यन्त
आणि वयसा वित्तकामु | ययांचा वाढवी संभ्रमु |
म्हणौनि मदें आश्रमु | तोचि केला ॥ ७५८ ॥
वयसा =तरुण्य संभ्रमु=गौरव आश्रमु=घर
आगीतें न सांडी तापु | सळातें जातीचा सापु |
कां जगाचा वैरी वासिपु | अखंडु जैसा ॥ ७५९ ॥
सळातें=वैर वासिपु=भय
नातरी शरीरातें काळु | न विसंबे कवणे वेळु |
तैसा आथी अढळु | तामसीं मदु ॥ ७६० ॥
आथी=असे
एवं पांचही हे निद्रादिक | तामसाच्या ठाईं दोख |
जिया धृती देख | धरिलें आहाती ॥ ७६१ ॥
तिये गा धृती नांवें | तामसी येथ हें जाणावें |
म्हणितलें तेणें देवें | जगाचेनी ॥ ७६२ ॥
एवं त्रिविध जे बुद्धि | कीजे कर्मनिश्चयो आधि |
तो धृती या सिद्धि | नेइजो येथ ॥ ७६३ ॥
सूर्यें मार्गु गोचरु होये | आणि तो चालती कीर पाये |
परी चालणें तें आहे | धैर्यें जेवीं ॥ ७६४ ॥
तैसी बुद्धि कर्मातें दावी | ते करणसामग्री निफजवी |
परी निफजावया होआवी | धीरता जे ॥ ७६५ ॥
करणसामग्री=इंद्रिये
ते हे गा तुजप्रती | सांगीतली त्रिविध धृती |
यया कर्मत्रया निष्पत्ती | जालिया मग ॥ ७६६ ॥
येथ फळ जें एक निफजे | सुख जयातें म्हणिजे |
तेंही त्रिविध जाणिजे | कर्मवशें ॥ ७६७ ॥
तरी फळरूप तें सुख | त्रिगुणीं भेदलें देख |
विवंचूं आतां चोख | चोखीं बोलीं ॥ ७६८ ॥
चोख =स्पष्ट चोखीं=नीट निर्विवाद
परी चोखी ते कैसी सांगे | पैं घेवों जातां बोलबगें |
कानींचियेही लागे | हातींचा मळु ॥ ७६९ ॥
बोलबगें= बोलाच्या मार्गाने
कानींचियेही
लागे | हातींचा मळु =कानास हाताचा मळ लागेल
=चोखपणा
मलिन होईल
म्हणौनि जयाचेनि अव्हेरें | अवधानही होय बाहिरें |
तेणें आइक हो आंतरें | जीवाचेनि जीवें ॥ ७७० ॥
बाहेरच्या
अवधानाचा त्याग करावा
ऐसें म्हणौनि देवो | त्रिविधा सुखाचा प्रस्तावो |
मांडला तो निर्वाहो | निरूपित असें ॥ ७७१ ॥
*********************************** *******************
No comments:
Post a Comment