ज्ञानेश्वरी /
अध्याय तिसरा / संत ज्ञानेश्वर
अर्जुन उवाच:
ज्यायसी चेत् कर्मणस्ते मता
बुद्धिर्जनार्दन।
तत् किं कर्मणि घोरे मां नियोजयसि केशव ॥ १ ॥
मग आइका अर्जुनें म्हणितलें, देवा तुम्हीं जें वाक्य बोलिले।
तें निकें म्यां परिसलें, कमळापती ॥ १ ॥
तत् किं कर्मणि घोरे मां नियोजयसि केशव ॥ १ ॥
मग आइका अर्जुनें म्हणितलें, देवा तुम्हीं जें वाक्य बोलिले।
तें निकें म्यां परिसलें, कमळापती ॥ १ ॥
निकें=नीट परिसलें=ऐकले
तेथ कर्म आणि कर्ता, उरेचिना पाहतां।
ऐसें मत तुझें अनंता, निश्चित जरी ॥ २ ॥
तरी मातें केवी हरी, म्हणसी पार्था संग्रामु करीं।
इये लाजसीना महाघोरीं, कर्मीं सुता ॥ ३ ॥
लाजसीना=लाजत नाही, कसेच कसे वाटत नाही
सुता=घालता ,प्रवृत करता
हां गा कर्म तूंचि अशेष, निराकारासी निःशेष।
तरी मजकरवीं हें हिंसक, कां करविसी तूं ॥ ४ ॥
तरीं हेंचि विचारीं हृषीकेशा, तूं मानु देसी कर्मलेशा।
आणि येसणी हे हिंसा, करवित अहासी ॥ ५ ॥
कर्मलेशा=किंचित कर्म येसणी=अशी
व्यामिश्रेणेव वाक्येन बुद्धिं मोहयसीव मे।
तदेकं वद निश्चित्य येन श्रेयोऽहमाप्नुयाम् ॥ २ ॥
देवा तुवांचि ऐसें बोलावें, तरी आम्हीं नेणतीं काय करावें।
आता संपले म्हणे पां आघवें, विवेकाचे ॥ ६ ॥
हां गा उपदेशु जरी ऐसा, तरी अपभ्रंशु तो कैसा।
आतां पुरला आम्हां धिंवसा, आत्मबोधाचा ॥ ७ ॥
अपभ्रंशु=गोंधळ, चुकीचा अर्थ . धिंवसा,=इच्छा
वैद्यु पथ्य वारूनि जाये, मग जरी आपणचि विष सुये।
तरी रोगिया कैसेनि जिये, सांगे मज ॥ ८ ॥
वारूनि=सांगून सुये=देणे घालणे
जैसे आंधळे सुईजे आव्हांटा, कां माजवण दीजे मर्कटा।
तैसा उपदेशु हा गोमटा, वोढवला आम्हां ॥ ९ ॥
सुईजे=प्रवेशे आव्हांटा=आडवाटा माजवण=मादक पदार्थ
मी आधींचि कांही नेणें, वरी कवळिलों मोहें येणें।
कृष्णा विवेकु या कारणें, पुसिला तुज ॥ १० ॥
तंव तुझी एकेकी नवाई, एथ उपदेशामाजीं गांवाई।
तरी अनुसरलिया काई, ऐसें कीजे ॥ ११ ॥
नवाई=नवलाई गांवाई=गुंता गोंधळ
आम्हीं तनुमनुजीवें, तुझिया बोला वोटंगावें।
आणि तुवांचि ऐसें करावें, तरी सरलें म्हणे ॥ १२ ॥
आम्हीं तनुमनुजीवें, तुझिया बोला वोटंगावें।
आणि तुवांचि ऐसें करावें, तरी सरलें म्हणे ॥ १२ ॥
वोटंगावें=अवलंबून राहावे
आतां ऐसियापरी बोधिसी, तरी निकें आम्हां करिसी।
एथ ज्ञानाची आस कायसी, अर्जुन म्हणे ॥ १३ ॥
निकें=चांगलेच
तरी ये जाणिवेचे तरी सरलें, परी आणिक एक असें जाहलें।
जें थितें हें थितें डहुळलें, मानस माझें ॥ १४ ॥
थितें=स्थिर डहुळलें=हलले
तेवींचि कृष्णा हें तुझें, चरित्र कांहीं नेणिजे।
जरी चित्त पाहसी माझें, येणे मिषें ॥ १५ ॥
ना तरी झकवितु आहासी मातें, की तत्वचि कथिलें ध्वनितें।
हे अवगमतां निरुतें, जाणवेना ॥ १६ ॥
झकवितु =फसवीशी ध्वनितें =गुढार्थे निरुतें,=निश्चित
म्हणोनि आइकें देवा, हा भावार्थु आतां न बोलावा।
मज विवेकु सांगावा, मऱ्हाटा जी ॥ १७ ॥
मी अत्यंत जड असें, परी ऐसाही निकें परियसें।
कृष्णा बोलावें तुवां तैसें, एकनिष्ठ ॥ १८ ॥
निकें=निश्चित
देखें रोगातें जिणावें, औषध तरी द्यावें।
परी तें अतिरुच्य व्हावें, मधुर जैसें ॥ १९ ॥
जिणावें=जिंकावे अतिरुच्य=अति रुचकर
तैसें सकळार्थभरित, तत्व सांगावे उचित।
परी बोधे माझें चित्त, जयापरी ॥ २० ॥
सकळार्थभरित=सर्व अर्थ भरलेले
देवा तुज ऐसा निजगुरु, आणि आर्तीधणी कां न करूं।
एथ भीड कवणाची धरूं, तूं माय आमुची ॥ २१॥
आर्तीधणी=इच्छापुर्ती
हां गा कामधेनूचें दुभतें, देवें जाहलें जरी आपैतें।
तरी कामनेची कां तेथें, वानी कीजे ॥ २२ ॥
आपैतें=प्राप्त
जरी चिंतामणि हातां चढे, तरी वांछेचे कवण सांकडे।
कां आपुलेनि सुरवाडें, इच्छावें ना ॥ २३ ॥
सुरवाडें=आवडी प्रमाणे
देखें अमृतसिंधूतें ठाकावें, मग तहाना जरी फुटावें।
मग सायासु कां करावे , मागील ते ॥ २४ ॥
फुटावें=तडफडावे
तैसा जन्मांतरी बहुतीं, उपासिता लक्ष्मीपती।
तूं दैवें आजि हातीं, जाहलासी जरी ॥ २५ ॥
तरी आपुलेया सवेसा, कां न मागावासी परेशा।
देवा सुकाळु हा मानसा, पाहला असे ॥ २६ ॥
सवेसा=इच्छा
देखें सकळार्तीचें जियालें, आजि पुण्य यशासि आलें।
हे मनोरथ जहाले, विजयी माझे ॥ २७ ॥
जी जी परममंगळधामा, देवदेवोत्तमा।
तूं स्वाधीन आजि आम्हां, म्हणऊनियां ॥ २८ ॥
जैसां मातेचां ठायीं, अपत्या अनवसरु नाहीं।
स्तन्यालागूनि पाहीं, जियापरी ॥ २९ ॥
अनवसरु=काळवेळ
तैसें देवा तूंते, पुसिजतसें आवडे तें।
आपुलेनि आर्तें, कृपानिधि ॥ ३० ॥
तरी पारत्रिकीं हित, आणि आचरितां तरी उचित।
ते सांगें एक निश्चित, पार्थु म्हणे ॥ ३१ ॥
पारत्रिकीं=परलोक
श्रीभगवानुवाच:
लोकेऽस्मिन् द्विविधा निष्ठा पुरा प्रोक्ता मयाऽनघ।
ज्ञानयोगेन सांख्यानां कर्मयोगेन योगिनां ॥ ३ ॥
या बोला अच्युतु, म्हणतसे विस्मितु।
अर्जुना हा ध्वनितु, अभिप्रावो ॥ ३२ ॥
ज्ञानयोगेन सांख्यानां कर्मयोगेन योगिनां ॥ ३ ॥
या बोला अच्युतु, म्हणतसे विस्मितु।
अर्जुना हा ध्वनितु, अभिप्रावो ॥ ३२ ॥
ध्वनितु=गुढार्थ
जे बुद्धियोगु सांगतां, सांख्यमतसंस्था।
प्रकटिली स्वभावता, प्रसंगे आम्हीं ॥ ३३ ॥
तो उद्देशु तूं नेणसी, म्हणोनि क्षोभलासि वायांचि।
तरी आता जाण म्यांचि, उक्त दोन्ही ॥ ३४ ॥
उक्त=बोललो
अवधारीं वीरश्रेष्ठा, यें लोकीं या दोन्ही निष्ठा।
मजचिपासूनि प्रगटा, अनादिसिद्धा ॥ ३५ ॥
एकु ज्ञानयोगु म्हणिजे, जो सांख्यीं अनुष्ठीजे।
जेथ ओळखीसवें पाविजे, तद्रूपता ॥ ३६ ॥
एक कर्मयोगु जाण, जेथ साधकजन निपुण।
होवूनिया निर्वाण, पावती वेळे ॥ ३७ ॥
हे मार्गु तरी दोनी, परि एकवटती निदानीं।
जैसे सिद्धसाध्यभोजनीं, तृप्ति एकी ॥ ३८ ॥
सिद्धसाध्यभोजनीं=जेवण बनवणारा ,तयार खाणारा
कां पूर्वापर सरिता, भिन्ना दिसती पाहतां।
मग सिंधूमिळणीं ऐक्यता, पावती शेखीं ॥ ३९ ॥
पूर्वापर=पूर्व पश्चिम
तैसीं दोनी ये मतें, सूचिती एका कारणातें।
परी उपास्ति ते योग्यते -, आधीन असे ॥ ४० ॥
उपास्ति=साधना उपासना आचरण
देखें उत्प्लवनासरिसा, पक्षी फळासि झोंबे जैसा।
सांगें नरु केवीं तैसा, पावे वेगां ॥ ४१ ॥
उत्प्लवना=उड्डाणा
तो हळूहळू ढाळेंढाळें, केतुकेनि एके वेळे।
मार्गाचेनि बळें, निश्चित ठाकी ॥ ४२ ॥
ढाळेंढाळें =फांदीफांदीवरून केतुकेनि=कधीतरी
तैसें देख पां विहंगममतें, अधिष्ठूनि ज्ञानातें।
सांख्य सद्य मोक्षातें, आकळिती ॥ ४३ ॥
विहंगम=पक्षी सद्य=लगेच
येर योगिये कर्माधारें, विहितेंचि निजाचारें।
पूर्णता अवसरें, पावतें होती ॥ ४४ ॥
विहितेंचि=योग्य त्या अवसरें=योग्य वेळी ,कालांतरे
न कर्मणामनारभान् नैष्कर्म्यं पुरुषोऽश्नुते।
न च संन्यसनादेव सिद्धिं समाधिगच्छति ॥ ४ ॥
वांचोनि कर्मारंभ उचित, न करितांचि सिद्धवत।
कर्महीना निश्चित, होईजेना ॥ ४५ ॥
सिद्धवत=सिद्धासारखे
कां प्राप्तकर्म सांडिजे, येतुलेनि नैष्कर्म्या होईजे।
हें अर्जुना वायां बोलिजे, मूर्खपणें ॥ ४६ ॥
सांगें पैलतीरा जावें, ऐसें व्यसन कां जेथ पावे।
तेथ नावेतें त्यजावें, घडे केवीं ॥ ४७ ॥
ना तरी तृप्ति इच्छिजे, तरी कैसेनि पाकु न कीजे।
कीं सिद्धुही न सेविजे, केवीं सांगें ॥ ४८ ॥
सिद्धुही=तयार (जेवण)
जंव निरार्तता नाहीं, तंव व्यापारु असे पाहीं।
मग संतुष्टीचां ठायीं, कुंठे सहजें ॥ ४९ ॥
निरार्तता=अनिच्छा, निष्कामता कुंठे=थांबणे
म्हणोनि आइकें पार्था, जया नैष्कर्म्यपदीं आस्था।
तया उचित कर्म सर्वथा, त्याज्य नोहे ॥ ५० ॥
आणि आपुलालिया चाडे, आपादिले हे मांडे।
कीं त्यजिलें हें कर्म सांडे, ऐसें आहे? ॥ ५१ ॥
म्हणोनि आइकें पार्था, जया नैष्कर्म्यपदीं आस्था।
तया उचित कर्म सर्वथा, त्याज्य नोहे ॥ ५० ॥
आणि आपुलालिया चाडे, आपादिले हे मांडे।
कीं त्यजिलें हें कर्म सांडे, ऐसें आहे? ॥ ५१ ॥
चाडे=मनाप्रमाणे आपादिले=घेताच मांडे =घडे
हें वायाचि सैरा बोलिजे, उकलु तरी देखों पाहिजे।
परी त्यजितां कर्म न त्यजे, निभ्रांत मानी ॥ ५२ ॥
सैरा=काहीही,व्यर्थ उकलु=स्पष्ट, यथार्थ
http://dnyaneshwariabhyas.blogspot.in/
No comments:
Post a Comment