ज्ञानेश्वरी /
अध्याय पहिला / संत ज्ञानेश्वर
ॐ
नमोजी आद्या, वेद प्रतिपाद्या।
जय
जय स्वसंवेद्या, आत्मरुपा ॥१॥
आद्या,=जेथून सर्व जगत उत्पत्ती झाली ते तत्व
वेद प्रतिपाद्या
= वेदांनी प्रतिपादन केलेले. स्वसंवेद्या,=स्वत: स्वत;ला जाणणारे
देवा तूंचि गणेशु, सकलमति प्रकाशु।
म्हणे निवृत्ति दासु, अवधारिजो जी ॥२॥
देवा तूंचि गणेशु, सकलमति प्रकाशु।
म्हणे निवृत्ति दासु, अवधारिजो जी ॥२॥
अवधारिजो=ऐका
हें शब्दब्रह्म अशेष, तेचि मूर्ति सुवेष।
तेथ वर्णवपु निर्दोष, मिरवत असे ॥३॥
हें शब्दब्रह्म अशेष, तेचि मूर्ति सुवेष।
तेथ वर्णवपु निर्दोष, मिरवत असे ॥३॥
शब्दब्रह्म=वेद
अशेष=संपूर्ण . सुवेष =सुंदर. वर्णवपु =वर्ण(शब्द)रुपी देह .
स्मृति तेचि अवयव, देखा अंगिकभाव।
तेथ लावण्याची ठेव, अर्थशोभा ॥४॥
स्मृति तेचि अवयव, देखा अंगिकभाव।
तेथ लावण्याची ठेव, अर्थशोभा ॥४॥
अंगिकभाव=शरीर
ठेवण
अष्टादश पुराणे, तीचि मणिभूषणे।
पदपद्धती खेवणे, प्रमेयरत्नांची ॥५॥
पदपद्धती खेवणे = छंदोबद्ध काव्य रचना हे कोंदण
प्रमेयरत्नांची=
प्रतिपादित तत्वे,सिद्धांत
पदबंध नागर, तेचि रंगाथिले अंबर।
जेथ साहित्यवाणे, सपूर उजाळाचे ॥६॥
पदबंध=शब्दरचना. नागर=उत्तम,सुंदर. रंगाथिले= रंगविले.अंबर=वस्त्र
साहित्यवाणे =
साहित्य रुपी धागा. सपूर = नाजूक. उजाळाचे=झळाळत
देखा काव्यनाटका, जे निर्धारिता सकौतुका।
त्याचि रुणझुणती क्षुद्रघंटिका, अर्थध्वनी ॥ ७॥
देखा काव्यनाटका, जे निर्धारिता सकौतुका।
त्याचि रुणझुणती क्षुद्रघंटिका, अर्थध्वनी ॥ ७॥
निर्धारिता=पाहता
नाना प्रमेयांचि परी, निपुणपणे पाहता कुसरी।
दिसती उचित पदे माझारी, रत्नें भली ॥ ८॥
नाना प्रमेयांचि परी, निपुणपणे पाहता कुसरी।
दिसती उचित पदे माझारी, रत्नें भली ॥ ८॥
निपुणपणे=नीट सूक्ष्मपणे. कुसरी= रचना (सजावट)
माझारी=मधे
तेथ व्यासादिकांच्या मति, तेचि मेखळा मिरवती।
चोखाळपणे झळकती, पल्लवसडका ॥ ९॥
मेखळा=शेला (साखळी) पल्लवसडका=पदराचे शेव
तेथ व्यासादिकांच्या मति, तेचि मेखळा मिरवती।
चोखाळपणे झळकती, पल्लवसडका ॥ ९॥
मेखळा=शेला (साखळी) पल्लवसडका=पदराचे शेव
देखा षड्दर्शने म्हणिपती, तेचि भुजांची आकृती ॥
म्हणऊनि विसंवादे धरिती, आयुधे हाती ॥ १०॥
विसंवादे=एकमेका
न मिळणारी (पटणारी)
तरी तर्क तोचि
परशु, नीतिभेदु अंकुशु।
वेदांतु तो
महारसु, मोदकाचा ॥ ११ ॥
१ तर्क=कणाद
शास्त्ररुपी अनुमान वैशेषिक
दर्शन
२ नीतिभेदु= गौतमिय न्यायशास्त्रदर्शन
३ वेदांत रुपी
मोदक
एके हाति दंतु, जो स्वभावता खंडितु।
तो बौद्धमत संकेतु, वार्तिकांचा ॥ १२ ॥
बौद्धमत संकेतु=बौद्धमत निर्देशक
४ वार्तिकांचा =पातंजल दर्शन (रुपी हातात)
मग सहजे सत्कारवादु, तो पद्मकरु वरदु।
धर्मप्रतिष्ठा तो सिद्धु, अभयहस्तु ॥ १३
५ सत्कारवादु=महर्षी कपिल प्रतिपादित सांख्यमत
६ अभयहस्तु=अभयकर (जैमिनिकृत धर्मसूत्रे) मीमांसा दर्शन
देखा विवेकमंतु सुविमळु, तोचि शुंडादंडु सरळु।
जेथ परमानंदु केवळु, महासुखाचा ॥ १४ ॥
विवेकमंतु सुविमळु =कुठलाही मल नसलेला सुंदर असा विवेक
जेथ परमानंदु केवळु, महासुखाचा ॥ १४ ॥
विवेकमंतु सुविमळु =कुठलाही मल नसलेला सुंदर असा विवेक
शुंडादंडु=सोंड
तरी संवादु तोचि दशनु, जो समताशुभ्रवर्णु।
देवो उन्मेषसुक्ष्मेक्षणु, विघ्नराजु ॥ १५ ॥
समताशुभ्रवर्णु=समतारुपीशुभ्र
वर्णाचा वरील दात
उन्मेषसुक्ष्मेक्षणु=उन्मेष रुपी लहान डोळ्यांचा
मज अवगमलिया दोनी, मीमांसा श्रवणस्थानी।
बोधमदामृत मुनी, अलि सेविती ॥ १६ ॥
अवगमलिया=वाटतात दोनी मीमांसा =पूर्व आणि उत्तर मीमांसा
श्रवणस्थानी=कान
बोधमदामृत- गंडस्थळातून
स्त्रवणारा बोधरूपी मद
अलि=मधमाश्या
प्रमेयप्रवाल सुप्रभ, द्वैताद्वैत तेचि निकुंभ।
सरिसे एकवटत, इभ मस्तकावरी ॥ १७ ॥
प्रमेयप्रवाल
सुप्रभ =प्रमेयरुपी प्रवाळानी शोभायमान
निकुंभ =गंडस्थळ
इभ=हत्ती
उपरि दशोपनिषदे, जिये उदारे ज्ञानमकरंदे।
तिये कुसुमे मुगुटी सुगंधे, शोभती भली ॥ १८ ॥
उपरि दशोपनिषदे, जिये उदारे ज्ञानमकरंदे।
तिये कुसुमे मुगुटी सुगंधे, शोभती भली ॥ १८ ॥
मकरंदे= मध
अकार चरणयुगुल, उकार उदर विशाल।
मकार महामंडल, मस्तकाकारे ॥ १९ ॥
हे तिन्ही एकवटले, तेथ शब्दब्रह्म कवळले।
ते मियां गुरूकृपा नमिले, आदिबीज ॥ २० ॥
शब्दब्रह्म= ॐ
आतां अभिनव वाग्विलासिनी, जे चातुर्यार्थकलाकामिनी।
ते शारदा विश्वमोहिनी, नमिली मियां ॥ २१ ॥
आतां अभिनव वाग्विलासिनी, जे चातुर्यार्थकलाकामिनी।
ते शारदा विश्वमोहिनी, नमिली मियां ॥ २१ ॥
अभिनव
=अपूर्व
.वाग्विलासिनी-=वाचेतून विलास करणारी
चातुर्यार्थकलाकामिनी= चौषष्टकलांची स्वामिनी
चातुर्यार्थकलाकामिनी= चौषष्टकलांची स्वामिनी
ॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐ
धन्यवाद ! मला बऱ्याच ठिकाणी अर्थबोध होतं नव्हता तो झाला. आनंद वाटला .
ReplyDeleteखूपच मार्गदर्शक आणि उद्बोधक. फक्त एक विनंती करावीशी वाटते. प्रत्येक ओवीतील श्ब्दांचा जसा अर्थ दिला आहे, त्याप्रमाणे ओवीचाही सर्वंकष अर्थ द्यावा. माझ्याकडे ज्ञानेश्वरी ग्रंथाच्या तीन आवृत्त्या आहेत. प्रत्येक ग्रंथात एका पानावर ओव्या आणि समोरच्या पानावर त्या ओव्यांचा अर्थ आहे. पण अशा पद्धतीने अर्थबोध होत नाही. गोंधळ होतो. सर्व ग्रंथ पोथीवाचने, पारायणे यासाठी रचली आहेत. वाचनास्वाद मात्र घेता येत नाही. नुसतेच वाचन होते. त्यामुळे मी अनेकदा सुरुवात केली आणि थांबलो. समाधान मिळत नाही. त्यापेक्षा, - ओवी, तिचा तिथेच लगेच अर्थ - अशा पद्धतीने देणारा एखादा छापील ग्रंथ माहीत असल्यास कृपया सुचवावा. अन्यथा आपल्या या लेखांकात तशी रचना देता आली, तर उत्तमच. आभारी राहीन.
ReplyDelete