ज्ञानेश्वरी / अध्याय पांचवा / संत ज्ञानेश्वर
कर्मसंन्यास योग अध्याय १ ते ५०
अर्जुन उवाचः
संन्यासं कर्मणां कृष्ण पुनर्योगं च शंससि।
यत् श्रेयं एतयोरेकें तत् मे ब्रूहि सुनिश्चितम् ॥ १ ॥
मग पार्थु श्रीकृष्णातें म्हणे, हां हो हें कैसें तुमचे बोलणें।
एक होय तरी अंतःकरणे, विचारूं ये ॥ १ ॥
यत् श्रेयं एतयोरेकें तत् मे ब्रूहि सुनिश्चितम् ॥ १ ॥
मग पार्थु श्रीकृष्णातें म्हणे, हां हो हें कैसें तुमचे बोलणें।
एक होय तरी अंतःकरणे, विचारूं ये ॥ १ ॥
अंतःकरणे=मनापासून विचारूं ये=विचार करता येईल असा
मागां सकळ कर्माचा संन्यासु, तुम्हींचि निरोपिला होता बहुवसु।
तरी कर्मयोगीं केवीं अतिरसु, पोखीतसां पुढती ॥ २ ॥
अतिरसु=गोडी
बहुवसु=पुष्कळ . पोखीतसां=पुष्ट करता ,आग्रह धरिता
बहुवसु=पुष्कळ . पोखीतसां=पुष्ट करता ,आग्रह धरिता
ऐसें द्व्यर्थ हें बोलतां, आम्हां नेणतयांचिया चित्ता।
आपुलिये चाडे अनंता, उमजू नोहे ॥ ३ ॥
नेणतयांचिया =अज्ञानी चाडे= इच्छा
एकें एकसारातें बोधिजे, तरी एकनिष्ठचि बोलिजे।
हें आणिकीं काय सांगिजे, तुम्हांप्रति ॥ ४ ॥
एकें एकसारातें बोधिजे, तरी एकनिष्ठचि बोलिजे।
हें आणिकीं काय सांगिजे, तुम्हांप्रति ॥ ४ ॥
एकसारातें=एकसारखे ,एकच काय ते .
तरी याचिलागीं तुमतें, म्यां राऊळासी विनविले होते।
जे हा परमार्थु ध्वनितें, न बोलावा ॥ ५ ॥
तरी याचिलागीं तुमतें, म्यां राऊळासी विनविले होते।
जे हा परमार्थु ध्वनितें, न बोलावा ॥ ५ ॥
राऊळासी=श्रीकृष्ण ध्वनितें=गूढपणे
परी मागील असो देवा, आतां प्रस्तुतीं उकलु देखावा।
सांगे दोहींमाजि बरवा, मार्गु कवण ॥ ६ ॥
बरवा=चांगला
जो परिणामींचा निर्वाळा, अचुंबितु ये फळा।
आणि अनुष्ठिता प्रांजळा, सावियाचि ॥ ७ ॥
निर्वाळा=शुद्ध प्रांजळा=सोपा सावियाचि=सहज
जैसें निद्रेचे सुख न मोडे, आणि मार्गु तरी बहुसाल सांडे।
तैसें सोकासनां सांगडे, सोहपें होय ॥ ८ ॥
सोकासनां=सुखदायी वाहन सांगडे=सारखे
येणें अर्जुनाचेनि बोले, देवो मनीं रिझले।
मग होईल ऐकें म्हणितले, संतोषोनियां ॥ ९ ॥
देखा कामधेनु ऐसी माये, सदैवा जया होये।
तो चंद्रुहि परी लाहे खेळावया ॥ १० ॥
पाहें पां शंभूची प्रसन्नता, तया उपमन्यूचिया आर्ता।
काय क्षीराब्धि दूधभाता, देईजेचिना ॥ ११ ॥
येणें अर्जुनाचेनि बोले, देवो मनीं रिझले।
मग होईल ऐकें म्हणितले, संतोषोनियां ॥ ९ ॥
देखा कामधेनु ऐसी माये, सदैवा जया होये।
तो चंद्रुहि परी लाहे खेळावया ॥ १० ॥
पाहें पां शंभूची प्रसन्नता, तया उपमन्यूचिया आर्ता।
काय क्षीराब्धि दूधभाता, देईजेचिना ॥ ११ ॥
आर्ता=तहान
तैसा औदार्याचा कुरुठा, कृष्ण आपु जाहलिया सुभटा।
कां सर्व सुखांचा वसौटा, तोचि नोहावा ॥ १२ ॥
कुरुठा=घर मुक्काम वसौटा=वस्तीस्थान
एथ चमत्कारु कायसा, गोसावी लक्ष्मीकांताऐसा।
आतां आपुलिया सवेसा, मागावा कीं ॥ १३ ॥
गोसावी=स्वामी सवेसा=इच्छा
म्हणोनि अर्जुने म्हणितले, तें हांसोनि येरें दिधले।
तेंचि सांगेन बोलिले, काय कृष्णें ॥ १४ ॥
श्रीभगवानुवाचः संन्यासं कर्मयोगश्च निःश्रेयसकरावुभौ।
तयोस्तु कर्मसंन्यासात् कर्मयोगो विशिष्यते ॥ २ ॥
तो म्हणे गा कुंतीसुता, हे संन्यासयोगु विचारितां।
मोक्षकर तत्वता, दोनीहि होती ॥ १५ ॥
संन्यासयोगु=संन्यास आणि कर्मयोग
तरी जाणां नेणां सकळां, हा कर्मयोगु कीर प्रांजळा।
जैसी नाव स्त्रियां बाळां, तोयतरणीं ॥ १६ ॥
प्रांजळा= सरळ सोपा तोय=पाणी
तैसें सारासार पाहिजे, तरी सोहपा हाचि देखिजे।
येणें संन्यासफळ लाहिजे, अनायासें ॥ १७ ॥
आतां याचिलागीं सांगेन, तुज संन्यासियाचे चिन्ह।
मग सहजें हे अभिन्न, जाणसी तूं ॥ १८ ॥
ज्ञेयः स नित्यसंन्यासी यो न द्वेष्टि न काङक्षति।
निर्द्वंद्वो हि महाबाहो सुखं बंधात् प्रमुच्यते ॥ ३ ॥
तरी गेलियाचि से न करी, न पवतां चाड न धरी।
जो सुनिश्चळु अंतरीं, मेरु जैसा ॥ १९ ॥
से=पर्वा चाड=इच्छा आवड
आणि मी माझें ऐसी आठवण, विसरले जयाचे अंतःकरण।
पार्था तो संन्यासी जाण, निरंतर ॥ २० ॥
जो मनें ऐसा जाहला, संगी तोचि सांडिला।
म्हणोनि सुखें सुख पावला, अखंडित ॥ २१ ॥
संगी=मोह
आतां गृहादिक आघवें, तें कांहीं नलगे त्यजावें।
जें घेतें जाहलें स्वभावें, निःसंगु म्हणऊनि ॥ २२ ॥
देखें अग्नि विझोनि जाये, मग जे रांखोंडी केवळु होये।
तैं ते कापुसें गिंवसूं ये, जियापरी ॥ २३ ॥
गिंवसूं=गुंडाळणे धरणे
तैसा असतेनि उपाधी, नाकळिजे जो कर्मबंधीं।
जयाचीचे बुद्धी, संकल्पु नाहीं ॥ २४ ॥
म्हणोनि कल्पना जैं सांडे, तैंचि गा संन्यासु घडे।
या कारणे दोनी सांगडे, संन्यासयोगु ॥ २५ ॥
सांगडे=सारखे
सांख्ययोगौ पृथक् बालाः प्रवदन्ति न पंडिताः।
एकमप्यास्थितः सम्यगुभयोर्विन्दते फलम् ॥ ४ ॥
एऱ्हवीं तरी पार्था, जे मूर्ख होती सर्वथा।
ते सांख्यकर्मसंस्था, जाणती केवीं ॥ २६ ॥
सांख्यकर्मसंस्था= सांख्ययोग व कर्मयोग व्यवस्था
सहजें ते अज्ञान, म्हणोनि म्हणती हे भिन्न।
एऱ्हवी दीपाप्रती काई अनान, प्रकाशु आहाती ॥ २७ ॥
सहजें ते अज्ञान, म्हणोनि म्हणती हे भिन्न।
एऱ्हवी दीपाप्रती काई अनान, प्रकाशु आहाती ॥ २७ ॥
अनान=वेगवेगळे
पैं सम्यक् एकें अनुभवें, जिहीं देखिलें तत्व आघवें।
ते दोन्हीतेंही ऐक्यभावें, मानिती गा ॥ २८ ॥
सम्यक् = संपूर्ण
यत् सांख्यैः प्राप्यते स्थानं तत योगैरपि गम्यते।
एकं सांख्यं च योगं च यः पश्यति स पश्यति ॥ ५ ॥
आणि सांख्यीं जें पाविजे, तेंचि योगीं गमिजे।
म्हणोनि ऐक्यता दोहींते सहजें, इयापरी ॥ २९ ॥
देखें आकाशा आणि अवकाशा, भेदु नाहीं जैसा।
तैसे ऐक्य योगसंन्यासा, वोळखे जो ॥ ३० ॥
तयासीचि जगीं पाहलें, आपणपें तेणेंचि देखिलें।
जया सांख्ययोग जाणवले, भेदेंविण ॥ ३१ ॥
आपणपें=स्वत:ला (आत्मा असे )
संन्यासस्तु महाबाहो दुःखमाप्तुमयोगतः।
योगयुक्तो मुनिर्ब्रह्म न चिरेणाधिच्छति ॥ ६ ॥
जो युक्तिपंथें पार्था, चढे मोक्षपर्वता।
तो महासुखाचा निमथा, वहिला पावे ॥ ३२ ॥
निमथा=टोक वहिला =लवकर
येरा योगस्थिति जया सांडे, तो वायांचि गा हव्यासीं पडे।
परि प्राप्ति कहीं न घडे, संन्यासाची ॥ ३३ ॥
योगस्थिति = कर्मयोग
योगयुक्तो विशुध्दात्मा विजितात्मा जितेद्रियः,
सर्वभूतात्मभूतात्मा कुर्वन्नपि न लिप्यते ॥ ७ ॥
जेणें भ्रांतीपासूनि हिरतलें, गुरुवाक्यें मन धुतलें।
मग आत्मस्वरुपीं घातलें, हारौनियां ॥ ३४ ॥
हिरतलें=हिरावले हारौनियां=हरवून ,एकरूप करून
जैसें समुद्रीं लवण न पडे, तवं वेगळे अल्प आवडे।
मग होय सिंधूचि एवढें, मिळे तेव्हां ॥ ३५ ॥
तैसें संकल्पोनि काढिलें, जयाचें मनचि चैतन्य जाहलें।
तेणें एकदेशियें परि व्यापिलें , लोकत्रय ॥ ३६ ॥
आतां कर्ता कर्म करावें , हें खुंटलें तया स्वभावें।
आणि करी जऱ्ही आघवें, तऱ्ही अकर्ता तो ॥ ३७ ॥
नैव किंचित् करोमीति युक्तो मन्येत तत्वचित्।
पश्चन् शृण्वन् स्पृशन् जिघ्रन्नश्नन् गच्छन् स्वपन् श्वसन् ॥ ८ ॥
प्रलपन् विसृजन् गृण्हन्नुन्मिषन् निमिषन्नपि।
इंद्रियाणीन्द्रियार्थेषु वर्तन्त इति धारयन् ॥ ९ ॥
जे पार्था तया देहीं, मी ऐसा आठऊ नाहीं।
तरी कर्तृत्व कैचें काई, उरे सांगे ॥ ३८ ॥
ऐसें तनुत्यागेंवीण, अमूर्ताचे गुण,
दिसती संपूर्ण , योगयुक्तां ॥ ३९ ॥
एऱ्हवीं आणिकांचिये परी, तोही एक शरीरी।
अशेषाही व्यापारीं, वर्ततु दिसे ॥ ४० ॥
तोही नेत्रीं पाहे, श्रवणीं ऐकतु आहे।
परि तेथींचा सर्वथा नोहे, नवल देखें ॥ ४१ ॥
स्पर्शासि तरी जाणे, परिमळु सेवी घ्राणें।
अवसरोचित बोलणें, तयाहि आथी ॥ ४२ ॥
आहारातें स्वीकारी, त्यजावें तें परिहरि।
निद्रेचिया अवसरीं, निदिजे सुखें ॥ ४३ ॥
आपुलेनि इच्छावशें, तोही गा चालतु दिसे।
पैं सकळ कर्म ऐसें, रहाटे कीर ॥ ४४ ॥
हें सांगों काई एकैक, देखें श्वासोच्छासादिक।
आणि निमिषोन्निमिष, आदिकरुनि ॥ ४५ ॥
निमिषोन्निमिष=पापण्याची उघडझाप
पार्था तयाचे ठायीं , हें आघवेंचि आथि पाहीं।
परि तो कर्ता नव्हे कांही, प्रतीतिबळें ॥ ४६ ॥
जैं भ्रांती सेजे सुतला, तैं स्वप्नसुखें भुतला।
मग तो ज्ञानोदयी चेइला, म्हणोनियां ॥ ४७ ॥
सुतला=निजला . भुतला=व्यापला .चेइला=उठला
ब्रह्मण्याधाय कर्माणि संग त्यक्त्वा करोति यः।
लिप्यते न स पापेन पद्मपत्रमिवाम्भ्सा ॥ १० ॥
आतां अधिष्ठानसंगती, अशेषाही इंद्रियवृत्ती।
आपुलालिया अर्थीं, वर्तत आहाती ॥ ४८ ॥
अधिष्ठान=आश्रय (चैतन्याचा )
दीपाचेनि प्रकाशें, गृहींचे व्यापार जैसे।
देहीं कर्मजात तैसे, योगयुक्ता ॥ ४९ ॥
तो कर्में करी सकळें, परी कर्मबंधा नाकळे।
जैसें न सिपें जळीं जळें, पद्मपत्र ॥ ५० ॥
http://dnyaneshwariabhyas.blogspot.in/
==============================
आनंददायक !
ReplyDelete