सहावा अध्याय ओव्या २०१ ते २६०
समं कायशिरोग्रीवं धारयन्नचलं स्थिरः।
संप्रेक्ष्य नासिकाग्रं स्वं दिशश्चानवलोकयन् ॥ १३ ॥
तंव करसंपुट आपैसें, वाम चरणीं बैसे।
तंव बाहुमुळीं दिसे, थोरवी आली ॥ २०१ ॥
करसंपुट=तळवे बाहुमुळीं= खांदे थोरवी =वर आले
माजी उभारलेनि दंडें, शिरकमळ होय गाढें।
नेत्रद्वारीची कवाडें, लागूं पहाती ॥ २०२ ॥
दंडें=कणा
गाढें= घट्ट कवाडें=दरवाजा
गाढें= घट्ट कवाडें=दरवाजा
वरचिलें पाती ढळती, तळींची तळीं पुंजाळती।
तेथ अर्धोन्मीलित स्थिती, उपजे तया ॥ २०३ ॥
पाती=पापणी पुंजाळती=पसरती
दिठी राहोनि आंतुलीकडे, बाहेर पाऊल घाली कोडें।
ते ठायीं ठावो पडे, नासाग्रपीठीं ॥ २०४ ॥
ऐसें आंतुच्या आंतुचि रचे, बाहेरी मागुतें न वचे।
म्हणौनि राहणें आधिये दिठीचें, तेथेंचि होय ॥ २०५ ॥
आतां दिशांचि भेटी घ्यावी, कां रुपाची वाट पहावी।
हे चाड सरे आघवी, आपैसया ॥ २०६ ॥
मग कंठनाळ आटे, हनुवटी हे हडौति दाटे।
ते गाढी होऊनि नेहटे, वक्षःस्थळीं ॥ २०७ ॥
हडौति= गळ्याखालील खड्डा गाढी=घट्ट नेहटे=शिरणे
माजीं घंटिका लोपे, वरी बंधु जो आरोपे।
तो जालंधरु म्हणिपे, पंडुकुमरा ॥ २०८ ॥
घंटिका=कंठमणी,स्वरयंत्राचे हाड
नाभीवरी पोखे, उदर हें थोके।
अंतरीं फांके, हृदयकोशु ॥ २०९ ॥
पोखे=वार येणे थोके=लहान होणे, खाली जाणे
स्वाधिष्ठानावरिचिले कांठीं, नाभीस्थानातळवटीं।
बंधु पडे किरीटी, वोढियाणा तो ॥ २१० ॥
वोढियाणा=उडडीयान बंध
प्रशान्तात्मा विगतभीर्ब्रह्मचारिव्रते स्थितः।
मनः संयम्य मच्चित्तो युक्त आसीत मत्परः ॥ १४ ॥
ऐसी शरीराबाहेरलीकडे, अभ्यासाची पांखर पडे।
तंव आंतु त्राय मोडे, मनोधर्माची ॥ २११ ॥
पांखर= साऊली.सहारा त्राय=बळ
कल्पना निमे, प्रवृत्ती शमे।
आंग मन विरमे, सावियाचि ॥ २१२॥
विरमे=विराम पावणे सावियाचि=सहज
क्षुधा काय जाहाली, निद्रा केउती गेली।
हे आठवणही हारपली, न दिसे वेगां, २१३ ॥
वेगां=जोर
जो मुळबंधे कोंडला, अपानु माघौता मुरडला।
तो सवेंचि वरी सांकडला, फुगु धरी ॥ २१४ ॥
मुरडला=वळला सांकडला=अडवला
क्षोभलेपणें माजे, उवाइला ठायी गाजे।
मणिपुरेंसी झुंजे, राहोनियां ॥ २१५ ॥
क्षोभ=राग
उवाइला=आनंदाने मणिपुरेंसी=मणिपूर चक्र
उवाइला=आनंदाने मणिपुरेंसी=मणिपूर चक्र
मग थावलीये वाहटुळी, सैंघ घेऊनि घर डहुळी।
बाळपणींची कुहीटुळी, बाहेर घाली ॥ २१६ ॥
थावलीये=बळावली सैंघ=सर्व कुहीटुळी=कुजका मळ
भीतरीं वळी न धरे, कोठ्यामाजीं संचरे।
कफपित्ताचे थारे, उरों नेदी॥ २१७।।
वळी=वळणे (जागा नसल्याने)
धांतुचे समुद्र उलंडी, मेदाचे पर्वत फोडी।
आंतली मज्जा काढी, अस्थिगत ॥ २१८ ॥
नाडीतें सोडवी, गात्रांतें विघडवी।
साधकांते भेडसावी, परि बिहावें ना ॥ २१९ ॥
विघडवी=सैल करी बिहावें=भ्यावे
व्याधीतें दावी, सवेंचि हरवी।
आप पृथ्वी कालवी, एकवाट ॥ २२० ॥
तंव येरीकडे धनुर्धरा, आसनाचा उबारा।
शक्ती करी उजगरा, कुंडलिनीते ॥ २२१ ॥
उजगरा=जागवी
नागाचें पिलें, कुंकुमें नाहलें।
वळण घेऊनि आलें, सेजे जैसें ॥ २२२।।
तैशी ते कुंडलिनी, मोटकी औट वळणी।
अधोमुख सर्पिणी, निजैली असे ॥ २२३ ॥
औट =साडेतीन वळणी= वेढे
विद्युलतेची विडी, वन्हिज्वाळांची घडी।
पंधरेयाची चोखडी, घोंटीव जैशी ॥ २२४ ॥
विडी=गोल कडी
तैसी सुबध्द आटली, पुटीं होती दाटली।
तें वज्रासनें चिमुटली, सावधु होय ॥ २२५ ॥
सुबध्द आटली पुटीं=पोकळी
तेथ नक्षत्र जैसें उलंडलें, कीं सुर्याचें आसन मोडलें।
तेजाचे बीज विरुढलें, अंकुरेशीं ॥ २२६ ॥
तैशी वेढियातें सोडती, कवतिकें आंग मोडिती।
कंदावरी शक्ती, उठली दिसे ॥ २२७ ॥
कंदावरी=नाभी कंदावर
सहजें बहुतां दिवसांची भूक, वरी चेवविलीं तें होय मिष।
मग आवेशें पसरी मुख, ऊर्ध्वा उजू ॥ २२८ ॥
तेथ हृदयकोशातळवटीं, जो पवनु भरे किरीटी।
तया सगळेयाचि मिठी, देऊनि घाली ॥ २२९ ॥
मुखींच्या ज्वाळीं, तळीं वरी कवळी।
मांसाची वडवाळी।आरोगुं लागे ॥ २३० ॥
कवळी =व्यापणे वडवाळी=घास
जे जे ठाय समांस, तेथ आहाच जोडे घाउस।
पाठी एकदोनी घांस, हियाही भरी ॥ २३१ ॥
आहाच =सहज हियाही=हृदय
मग तळवे तळहात शोधी, उर्ध्वीचे खंड भेदी।
झाडा घे संधी, प्रत्यंगाचा ॥ २३२ ॥
उर्ध्वीचे खंड प्रत्यंगाचा
आधार तरी न संडी, परि नखींचेंही सत्त्व काढी।
त्वचा धुवूनि जडी, पांजरेशीं ॥ २३३ ॥
पांजरेशीं=हाडांशी
अस्थींचे नळे निरपे, शिरांचे हीर वोरपे।
तंव बाहेरी विरुढी करपे, रोमबीजांची ॥ २३४ ॥
निरपे= हीर=कड्या विरुढी=वाढ
मग सप्तधांतूच्या सागरीं, ताहानेली घोंट भरी।
आणि सवेंचि उन्हाळा करी, खडखडीत ॥ २३५ ॥
नासापुटौनि वारा, जो जातसे अंगुळे बारा।
तो गचिये धरुनि माघारा, आंतु घाली ॥ २३६ ॥
गचिये=गच्च
तेथ अध वरौतें आकुंचे, ऊर्ध्व तळौतें खांचे।
तया खेंवामाजि चक्राचे, पदर उरती ॥ २३७ ॥
अध=अपान वायू ऊर्ध्व=प्राणवायू
एऱ्हवीं तरी दोन्ही तेव्हांचि मिळती, परि कुंडलिनी नावेकु दुश्चित्त होती।
ते तयांतें म्हणे परौती, तुम्हीचि कायसीं एथें ॥ २३८ ॥
दुश्चित्त=कष्टी होवून रागावून
आइकें पार्थिव धातु आघवी, आरोगितां काहीं नुरवी।
आणि आपातें तंव ठेवी, पुसोनियां ॥ २३९ ॥
आपातें=पाणी
ऐसी दोनी भुतें खाये, ते वेळी संपूर्ण धाये,
मग सौम्य होऊनि राहे, सुषुम्नेपाशीं ॥ २४० ॥
तेथ तृप्तीचेनि संतोषें, गरळ जें वमी मुखें।
तेणें तियेचेनि पीयूषे, प्राणु जिये ॥ २४१ ॥
पीयूषे=अमृत
तो अग्नि आंतूनि निघे, परि सबाह्य निववूंचि लागे।
ते वेळी कसु बांधिती आंगे, सांडिला पुढती ॥ २४२ ॥
कसु= चैतन्य , सांडिला =हरवला पुढती=परत
मार्ग मोडिती नाडीचे, नवविधपण वायुचें।
जाय म्हणऊनि शरीराचे, धर्मु नाहीं ॥ २४३ ॥
नवविधपण=नऊ प्रकार
इडा पिंगळा एकवटती, गांठी तिन्ही सुटती।
साही पदर फुटती, चक्रांचे हे ॥ २४४॥
मग शशी आणि भानु, ऐसा कल्पिजे जो अनुमानु।
तो वातीवरी पवनु, गिवसितां न दिसे ॥ २४५ ॥
शशी भानू =श्वासाला दिलेली नावे वाती=ज्योत न हलणे
बुध्दीची पुळिका विरे, परिमळु घ्राणी उरे।
तोही शक्तिसवें संचरे, मध्यमेमाजी ॥ २४६ ॥
पुळिका=कणिका
तंव वरिलेकडोनि ढाळें, चंद्रामृताचें तळें।
कानवडोनि मिळे, शक्तिमुखीं ॥ २४७ ॥
ढाळें=हळूच कानवडोनि=कलंडणे
तेणें नाळके रस भरे, तो सर्वांगामाजीं संचरे।
जेथिंचा तेथ मुरे, प्राणपवनु ॥ २४८ ॥
नाळके=नळी
तातलिये मुसें, मेण निघोनि जाय जैसें।
कोंदली राहे रसें, वोतलेनि ॥ २४९ ॥
तातलिये
तैसे पिंडाचेनि आकारें, ते कळाचि कां अवतरे।
वरी त्वचेचेनि पदरें, पांगुरली असे ॥ २५० ॥
कळाचि= तेज
जैसी आभाळाची बुंथी, करुनि राहे गभस्ती।
मग फिटलिया दीप्ति, धरूं नये ॥ २५१ ॥
बुंथी=खोळ गभस्ती=सूर्य
तैसा आहाचवरि कोरडा, त्वचेचा असे पातवडा।
तो झडोनि जाय कोंडा, जैसा होय ॥ २५२ ॥
आहाचवरि =वरवरचा पातवडा=पाचोळा
मग काश्मीराचे स्वयंभ, कां रत्नबीजा निघाले कोंभ।
अवयवकांतीचि भांब, तैसी दिसे ॥ २५३ ॥
काश्मीराचे =केशर भांब,=शोभा
नातरि संध्यारागींचे रंग, काढूनि वळिलें तें आंग।
की अंतर्जोतीचें लिंग, निर्वाळिलें ॥ २५४ ॥
कुंकुमाचे भरींव, सिध्दरसांचे वोतींव।
मज पाहतां सावेव, शांतिचि ते ॥ २५५ ॥
तें आनंदचित्रींचें लेप, नातरी महासुखाचें रूप।
कीं संतोषतरूचें रोप, थांवलें जैसें ॥ २५६ ॥
तो कनकचंपकाचा कळा, कीं अमृताचा पुतळा।
नाना सासिंनला मळा, कोंवळिकेचा ॥ २५७ ॥
हो कां जे शारदियेचे वोलें, चंद्रबिंब पाल्हेलें।
कां तेजचि मूर्त बैसलें, आसनावरी ॥ २५८ ॥
पाल्हेलें=पालवले टवटवीत
तैसें शरीर होये, जे वेळीं कुंडलिनी चंद्र पिये।
मग देहाकृति बिहे, कृतांतु गा ॥ २५९ ॥
वृध्दाप्य तरी बहुडे, तारुण्याची गांठी विघडे।
लोपली उघडे, बाळदशा ॥ २६० ॥
बहुडे=मागे फिरे विघडे=सुटणे
निरपे= हीर=कड्या, तसेच ‘तीतलिये’ ओवी २४९ ह्याचे अर्थ लागत नाहीत. कृपया ते द्यावेत. बाकी छान !
ReplyDelete