ज्ञानेश्वरी / अध्याय पांचवा / संत ज्ञानेश्वर
कर्मसंन्यास योग अध्याय १०३ ते १४३
न प्रहृष्येत् प्रियं प्राप्य नोद्विजेत् प्राप्य् चाप्रियम्।
स्थिरबुध्दिरसंमूढो ब्रह्मविद् ब्रह्मणि स्थितः ॥ २० ॥
तरी मृगजळाचेनि पूरें, जैसें न लोटिजे कां गिरिवरें।
तैसा शुभाशुभीं न विकरे, पातलां जो ॥ १०३ ॥
लोटिजे=वाहून जाणे
तोचि तो निरुता, समदृष्टी तत्वता।
हरि म्हणे पंडुसुता, तोचि ब्रह्म ॥ १०४ ॥
निरुता = खराखुरा
ब्राह्यस्पर्शेष्वसक्तात्मा विन्दत्यात्मनि यत् सुखम्।
स ब्रह्मयोगयुक्तात्मा सुखमक्षयमश्नुते ॥ २१ ॥
जो आपणपे सांडुनि कहीं, इंद्रियग्रामावरी येणेंचि नाहीं।
तो विषय न सेवी हें काई, विचित्र येथ ॥ १०५ ॥
सहजें स्वसुखाचेनि अपारें, सुरवाडे अंतरें।
रचिला म्हणऊनि बाहिरें, पाउल न घली ॥ १०६ ॥
सुरवाडे=आनंदे
सांगे कुमुददळाचेनि ताटें, जो जेविला चंद्रकिरणें चोखटे।
तो चकोरु काई वाळुवंटे, चुंबितु आहे ॥ १०७ ॥
तैसें आत्मसुख उपाइलें, जयासि आपणपेचिं फावलें।
तया विषयो सहजे सांडवले, म्हणो काई ॥ १०८॥
उपाइलें=मिळाले
एऱ्हवीं तरी कौतुकें, विचारुनि पाहें पां निकें।
या विषयांचेनि सुखे, झकविती कवण ॥ १०९ ॥
झकविती=फसती
ये हि संस्पर्शजा भोगा दुःखयोनय एव ते।
आद्यन्तवन्तः कौन्तेय न तेषु रमते बुधः ॥ २२ ॥
जिहीं आपणपें नाहीं देखिलें, तेचि इहीं इंद्रियार्थीं रंजले।
जैसें रंकु का आळुकैलें, तुषातें सेवी ॥ ११० ॥
ये हि संस्पर्शजा भोगा दुःखयोनय एव ते।
आद्यन्तवन्तः कौन्तेय न तेषु रमते बुधः ॥ २२ ॥
जिहीं आपणपें नाहीं देखिलें, तेचि इहीं इंद्रियार्थीं रंजले।
जैसें रंकु का आळुकैलें, तुषातें सेवी ॥ ११० ॥
आळुकैलें=उपाशी तुषातें= तुषान्न,कोंडा
नातरी मृगें तृषापीडितें, संभ्रमें विसरोनि जळांते।
मग तोयबुद्धी बरडीतें, ठाकूनि येती ॥ १११ ॥
बरडीतें=बरड जमीन ,वाळवंट
तैसें आपणपें नाहीं दिठे, जयातें स्वसुखाचे सदा खरांटे।
तयासीचि विषय हे गोमटे, आवडती ॥ ११२ ॥
खरांटे=अभाव आवडती=वाटतात
एऱ्हवीं विषयीं काइ सुख आहे, हे बोलणेंचि सारिखें नोहे।
तरी विद्युत्स्फुरणें कां न पाहे, जगामाजीं ॥ ११३ ॥
विद्युत्स्फुरणें=विजेच्या कडकडात
सांगें वातवर्षआतपु धरे, ऐसे अभ्रछायाचि जरी सरे।
तरी त्रिमाळिकें धवळारें , करावीं कां ॥ ११४ ॥
सांगें वातवर्षआतपु धरे, ऐसे अभ्रछायाचि जरी सरे।
तरी त्रिमाळिकें धवळारें , करावीं कां ॥ ११४ ॥
वर्ष=वर्षा आतपु=उन त्रिमाळिकें धवळारें=तीनमजली घरे
म्हणोनि विषयसुख जें बोलिजे, तें नेणतां गा वायां जल्पिजे।
जैसें महूर कां म्हणिजे, विषकंदातें ॥ ११५ ॥
जल्पिजे=बडबडणे महूर=मधुर
नातरी भौमा नाम मंगळु, रोहिणीतें म्हणती जळु।
तैसा सुखप्रवादु बरळु, विषयिकु हा ॥ ११६ ॥
भौमा = मंगळ ग्रह रोहिणी =मृगजळ
बरळु=बडबड
हे असो आघवी बोली, सांग पा सर्पफणीची साउली।
ते शीतल होईल केतुली, मूषकासी ॥ ११७ ॥
जैसा आमिषकवळु पांडवा, मीनु न सेवी तंवचि बरवा।
तैसा विषयसंगु आघवा, निभ्रांत जाणें ॥ ११८ ॥
हे विरक्तांचिये दिठी, जैं न्याहाळिजे किरीटी।
तैं पांडुरोगाचिये पुष्टि-।सारिखें दिसे ॥ ११९ ॥
हे असो आघवी बोली, सांग पा सर्पफणीची साउली।
ते शीतल होईल केतुली, मूषकासी ॥ ११७ ॥
जैसा आमिषकवळु पांडवा, मीनु न सेवी तंवचि बरवा।
तैसा विषयसंगु आघवा, निभ्रांत जाणें ॥ ११८ ॥
हे विरक्तांचिये दिठी, जैं न्याहाळिजे किरीटी।
तैं पांडुरोगाचिये पुष्टि-।सारिखें दिसे ॥ ११९ ॥
पुष्टि=सूज
म्हणोनि विषयभोगी जें सुख, तें साद्यंतचि जाण दुःख।
परि काय कीजे मूर्ख, न सेवितां न सरे ॥ १२० ॥
तें अंतर नेणती बापुडे, म्हणोनि अगत्य सेवणें घडे।
सांगे पूयपंकीचे किडे, काय चिळसी घेती ॥ १२१ ॥
अंतर=भेद फरक चिळसी=किळस घाण वाटणे
तयां दुःखियां दुःखचि जिव्हार, ते विषयकर्दमींचे दर्दुर।
ते भोगजळींचे जलचर, सांडिती केवी ॥ १२२।।
जिव्हार=प्रिय कर्दमीं=चिखल दर्दुर=बेडूक
आणि दुःखयोनि जिया आहाती, तिया निरर्थका तरी नव्हती।
जरी विषयांवरी विरक्ती, धरिती जीव ॥ १२३ ॥
नातरी गर्भवासादि संकट, कां जन्ममरणींचे कष्ट।
हे विसांवेवीण वाट, वाहावी कवणें ॥ १२४ ॥
जरी विषयीं विषयो सांडिजेल, तरी महादोषी कें वसिजेल।
आणि संसारु हा शब्दु नव्हेल, लटिका जगीं ॥ १२५ ॥
म्हणोनि अविद्याजात नाथिलें, तें तिहींचि साच दाविलें।
जिहीं सुखबुद्धी घेतलें, विषयदुःख ॥ १२६ ॥
नाथिलें=नसलेले
या कारणें गा सुभटा, हा विचारितां विषय वोखटा।
तूं झणें कहीं या वाटा, विसरोनि जाशी ॥ १२७ ॥
झणें=नको कहीं=कधीच
पै यातें विरक्त पुरुष, त्यजिती कां जैसें विष।
निराशा तयां दुःख, दाविलें नावडे ॥ १२८ ॥
निराशा=निरिच्छ असल्याने दाविलें=विषयाने दाखवले
नावडे=वाटत नाही
शक्नोतीहैव यः सोढुं प्राक् शरीरविमोक्षणात्।
कामक्रोधोद्भवं वेगं स युक्तः सुखी नरः ॥ २३ ॥
ज्ञानियांच्या हन ठायीं, याची मातुही कीर नाहीं।
देहीं देहभावो जिहीं, स्ववश केले ॥ १२९ ॥
जयांतें बाह्याची भाष, नेणिजेचि निःशेष।
अंतरीं सुख, एक आथी ॥ १३० ॥
परि तें वेगळेपणें भोगिजे, जैसे पक्षिये फळ चुंबिजे।
तैसें नव्हे तेथ विसरिजे, भोगितेपणही ॥ १३१ ॥
भोगीं अवस्था एक उठी, ते अंहकाराचा अचळु लोटी।
मग सुखेंसि आंठी, गाढेपणें ॥ १३२ ॥
उठी=नाहीशी होते
अचळु =पडदा अडथळा (पर्वत) आंठी,=मिठी गाढेपणें=प्रगाढ
अचळु =पडदा अडथळा (पर्वत) आंठी,=मिठी गाढेपणें=प्रगाढ
तिये आलिंगनमेळीं, होय आपेंआप कवळी।
तेथ जळ जैसें जळी, वेगळें न दिसे ॥ १३३ ॥
आपेंआप=पाणी पाण्यास
कां आकाशीं वायु हारपे, तेथ दोन्ही हे भाष लोपे।
तैसे सुखचि उरे स्वरुपें, सुरतीं तिये ॥ १३४ ॥
सुरतीं=भोगी
ऐसी द्वैताची भाष जाय, मग म्हणों जरी एकचि होय।
तरी तेथ साक्षी कवणु आहे, जाणतें जे ॥ १३५ ॥
योऽन्तःसुखोऽन्तरारामस्तथान्तर्ज्योतिरेव यः।
स योगी ब्रह्मनिर्वाणं ब्रह्मभूतोऽधिगच्छति ॥ २४ ॥
लभन्ते ब्रह्मनिर्वाणमृषयः क्षीणकल्मषाः।
छिन्नद्वैधा यतात्मानः सर्वभूतहिते रताः ॥ २५ ॥
म्हणोनि असो हें आघवें, एथ न बोलणें काय बोलावें।
ते खुणाचि पावेल स्वभावें, आत्माराम ॥ १३६ ॥
जे ऐसेनि सुखें मातले, आपणपांचि आपण गुंतले।
ते मी जाणे निखळ वोतले, साम्यरसाचे ॥ १३७ ॥
ते आनंदाचे अनुकार, सुखाचे अंकुर।
कीं महाबोधें विहार, केले जैसे ॥ १३८ ॥
अनुकार=प्रतिबिंब विहार =घर वास्तव्य
ते विवेकाचें गांव, की परब्रह्मीचे स्वभाव।
नातरी अळंकारले अवयव, ब्रह्मविद्येचे ॥ १३९ ॥
ते सत्त्वाचे सात्त्विक, की चैतन्याचे आंगिक।
हें बहु असो एकैक, वानिसी काई ॥ १४० ॥
तूं संतस्तवनी रतसी, तरी कथेची से न करिसी।
कीं निराळी बोल देखसी, सनागर ॥ १४१ ॥
से =काळजी सनागर=चांगले छान
परि तो रसातिशयो मुकुळीं, मग ग्रंथार्थदीपु उजळीं।
करी साधुहृदयराउळीं, मंगळ उखा ॥ १४२ ॥
मुकुळीं= आवरून घे उखा = उषा
ऐसा श्रीगुरुचा उवायिला, निवृत्तिदासासी पातला।
मग तो म्हणे कृष्ण बोलिला, तेंचि आइका ॥ १४३ ॥
उवायिला= बोध घेतला
http://dnyaneshwariabhyas.blogspot.in/
Wonderful!
ReplyDelete