ज्ञानेश्वरी / अध्याय आठवा / अक्षरब्रह्मयोग /संत ज्ञानेश्वर ओव्या १ ते ५८
अर्जुन उवाचः किं
तद् ब्रह्म किमध्यात्मं किं कर्म पुरुषोत्तम।
अधिभूतं च किं प्रोक्तमधिदैवं किमुच्यते ॥ १ ॥
मग अर्जुनें म्हणितलें, हां हो जी अवधारिले।
जे म्यां पुसिले, ते निरूपिजो ॥ १॥
सांगा कवण तें ब्रह्म, काइसया नाम कर्म।
अथवा अध्यात्म, काय म्हणिपे ॥ २॥
अधिभूत तें कैसे, एथ अधिदैव तें कवण असे।
हें उघड मी परियेसें, तैसें बोला ॥ ३॥
अधियज्ञः कथं कोऽत्र देहेऽस्मिन् मधुसूदन।
प्रयाणकाले च कथं ज्ञेयोऽसि नियतात्मभिः ॥ २ ॥
देवा अधियज्ञ तो काई, कवण पां इये देही।
हें अनुमानासि कांही, दिठी न भरे ॥ ४॥
आणि नियता अंतःकरणी, तूं जाणिजसी देहप्रयाणी।
तें कैसेनि हें शारंगपाणी, परिसवा मातें ॥ ५॥
अधिभूतं च किं प्रोक्तमधिदैवं किमुच्यते ॥ १ ॥
मग अर्जुनें म्हणितलें, हां हो जी अवधारिले।
जे म्यां पुसिले, ते निरूपिजो ॥ १॥
सांगा कवण तें ब्रह्म, काइसया नाम कर्म।
अथवा अध्यात्म, काय म्हणिपे ॥ २॥
अधिभूत तें कैसे, एथ अधिदैव तें कवण असे।
हें उघड मी परियेसें, तैसें बोला ॥ ३॥
अधियज्ञः कथं कोऽत्र देहेऽस्मिन् मधुसूदन।
प्रयाणकाले च कथं ज्ञेयोऽसि नियतात्मभिः ॥ २ ॥
देवा अधियज्ञ तो काई, कवण पां इये देही।
हें अनुमानासि कांही, दिठी न भरे ॥ ४॥
आणि नियता अंतःकरणी, तूं जाणिजसी देहप्रयाणी।
तें कैसेनि हें शारंगपाणी, परिसवा मातें ॥ ५॥
नियता=संयमी
देखा धवळारी चिंतामणीचा, जरी पहुडला होय दैवाचा।
तरी वोसणताही बोल तयाचा, परी सोपु न वचे ॥ ६॥
धवळारी=चुन्याचे मोठे घर वोसणताही=बडबड सोपु =व्यर्थ
तैसें अर्जुनाचिया बोलासवें, आलें तेंचि म्हणितलें देवे।
परियेसें गा बरवे, जें पुसिले तुवां ॥ ७॥
किरीटी कामधेनूचा पाडा, वरी कल्पतरूचा आहे मांदोडा।
म्हणोनि मनोरथसिद्धीचिया चाडा, तो नवल नोहे ॥ ८॥
मांदोडा=मंडप चाडा=इच्छा
कृष्ण कोपोनि ज्यासि मारी, तो पावे परब्रह्मसाक्षात्कारी।
मा कृपेने उपदेशु करी, तो कैशापरी न पवेल ॥ ९॥
जैं कृष्णाचेया होइजे आपण, तैं कृष्ण होय आपुले अंतःकरण।
मग संकल्पाचे आंगण, वोळगती सिद्धी ॥ १०॥
वोळगती=सेवा करती, भेटती
परि ऐंसे जें प्रेम, अर्जुनींचि आथि निस्सीम।
म्हणऊनि तयाचे काम, सदा सफळ ॥ ११॥
आथि=असे
या कारणे श्रीअनंते, तें मनोगत तयाचें पुसतें।
होईल जाणूनि आइतें, वोगरूनि ठेविलें ॥ १२॥
आइतें =अगोदरच तयार वोगरूनि=वाढून
जें अपत्य थानी निगे, त्याची भूक ते मातेसीचि लागे।
एऱ्हवीं तें शब्दें काय सांगे, मग स्तन्य दे येरी ॥ १३॥
म्हणोनि कृपाळुवा गुरूचिया ठायी, हे नवल नोहे कांही।
परि तें असो आइका काई, जें देव बोलते जाहले ॥ १४॥
अक्षरं ब्रह्म परमं स्वभावोऽध्यात्ममुच्यते।
भूतभावोद्भवकरो विसर्गः कर्मसंज्ञित ॥ ३॥
मग म्हणितले सर्वेश्वरें, जें आकारी इये खोंकरें।
कोंदलें असत न खिरे, कवणे काळी ॥ १५॥
खोंकरें=फुटके (पोकळ) खिरे=गळे क्षरे
एऱ्हवीं सपूरपण तयाचें पहावें, तरि शून्यचि नव्हे स्वभांवें।
वरि गगनाचेनि पालवे, गाळूनि घेतलें ॥ १६॥
सपूरपण=सूक्ष्मता पालवे=पदराने
जें ऐसेंही परि विरूळें, इये विज्ञानाचिये खोळे।
हालवलेंही न गळे, ते परब्रह्म ॥ १७॥
विरूळें=विरळ पातळ
आणि आकाराचेनि जालेपणें, जन्मधर्मातें नेणे।
आकारलोपीं निमणें, नाहीं कहीं ॥ १८॥
ऐशिया आपुलियाची सहज स्थिती, जया ब्रह्माची नित्यता असती।
तया नाम सुभद्रापति, अध्यात्म गा ॥ १९॥
मग गगनी जेविं निर्मळें, नेणों कैंची एक वेळे।
उठती घनपटळे, नानावर्णे ॥२०॥
आणि आकाराचेनि जालेपणें, जन्मधर्मातें नेणे।
आकारलोपीं निमणें, नाहीं कहीं ॥ १८॥
ऐशिया आपुलियाची सहज स्थिती, जया ब्रह्माची नित्यता असती।
तया नाम सुभद्रापति, अध्यात्म गा ॥ १९॥
मग गगनी जेविं निर्मळें, नेणों कैंची एक वेळे।
उठती घनपटळे, नानावर्णे ॥२०॥
घनपटळे=ढग
तैसे अमूर्तीं तिये विशुध्दे, महदादि भूतभेदें।
ब्रह्मांडाचे बांधे, होंचि लागती ॥ २१॥
बांधे=आकार
पैं निर्विकल्पाचिये बरडी, कीं आदिसंकल्पाची फुटे विरूढी।
आणि ते सवेंचि मोडोनि ये ढोंढी, ब्रह्मगोळकांची ॥ २२॥
बरडी=बरड जमीन विरूढी=अंकुर पालवी ढोंढी=आकार
तया एकैकाचे भीतरीं पाहिजे, तंव बीजाचाचि भरिला देखिजे।
माजीं होतियां जातियां नेणिजे, लेख जीवां ॥ २३॥
लेख=गणती
मग तयागोळकांचे अंशांश, प्रसवती आदिसंकल्प असमसहास।
हें असो ऐसी बहुवस, सृष्टी वाढे ॥ २४॥
असमसहास=असंख्य
परि दुजेनविण एकला, परब्रह्मचि संचला।
अनेकत्वाचा आला, पूर जैसा ॥ २५॥
तैसें समविषमत्व नेणों कैचें, वांयांचि चराचर रचे।
पाहतां प्रसवतिया योनीचे, लक्ष दिसती ॥ २६॥
समविषमत्व=बरे वाईट लक्ष=लाख प्रकार
येरी जीवभावाचिये पालविये, कांही मर्यादा करूं नये।
पाहिजे कवण हें आघवें विये, तंव मूळ तें शून्य ॥ २७॥
येरी जीवभावाचिये पालविये, कांही मर्यादा करूं नये।
पाहिजे कवण हें आघवें विये, तंव मूळ तें शून्य ॥ २७॥
पालविये=पदराने (जवळकीने)
म्हणूनि कर्ता मुदल न दिसे, आणि शेखीं कारणही कांही नसे।
माजीं कार्यचि आपैसें, वाढोंचि लागे ॥ २८॥
शेखीं=शेवटी
ऐसा करितेनवीण गोचरू, अव्यक्तीं हा आकारू।
निपजे जो व्यापारू, तया नाम कर्म ॥ २९॥
गोचरू=दिसतो
अधिभूतं क्षरो भावः पुरुषश्चाधिदैवतम।
अधियज्ञोऽहमेवात्र देहे देहभृतां वर ॥ ४॥
आतां अधिभूत जें म्हणिपे, तेंहि सांगों संक्षेपें।
तरी होय आणि हारपे, अभ्र जैसें ॥ ३०॥
तैसें असतेपण आहाच, नाहीं होइजे हें साच।
जयांतें रूपा आणिती पांचपांच, मिळोनियां ॥ ३१ ॥
आहाच=वरवरचे पांचपांच=पाच तत्व
भूतांतें अधिकरूनि असे, आणि भूतसंयोगें तरि दिसे।
जे वियोगवेळे भ्रंशे, नामरूपादिक ॥ ३२ ॥
अधिकरूनि=आश्रय घेवून
तयातें अधिभूत म्हणिजे, मग अधिदैवत पुरूष जाणिजे।
जेणें प्रकृतीचें भोगीजे, उपार्जिलें ॥ ३३ ॥
उपार्जिलें=कमावले
जो चेतनेचा चक्षु, जो इंद्रियदेशीचा अध्यक्षु।
जो देहास्तमनीं वृक्षु, संकल्पविहंगमाचा ॥ ३४ ॥
देहास्तमनीं=देह पडल्यावर, (संकल्प मृत्यू नंतर आधीदैवा सवे जातात)
जो परमात्माचि परि दुसरा, जो अहंकारनिद्रा निदसुरा।
म्हणोनि स्वप्नींचिया बोरबारा, संतोषें शिणे ॥ ३५॥
निदसुरा=झोपलेला
जीव येणें नांवें, जयातें आळविजे स्वभावे।
तें अधिदैवत जाणावें, पंचायतनींचें ॥ ३६॥
आळविजे=बोलणे पंचायतनींचें=पंचतत्वांचे(शरीर)
आतां इयेचि शरीरग्रामीं, जो शरीरभावातें उपशमी।
तो अधियज्ञु एथ गा मी, पांडुकुमरा ॥ ३७॥
उपशमी=शांत करी नष्ट करी
येर अधिदैवाधिभूत, तेहि मीचि कीर समस्त।
परि पंधरें किडाळा मिळत, तें काय सांके नोहे ॥ ३८॥
पंधरें=सोने किडाळा=भेसळ सांके=हिणकस
तरि ते पंधरेपण न मैळे, आणि किडाळाचियाही अंशा न मिळे।
परि जंव असे तयाचेनि मेळें, तव सांकेंचि म्हणिजे ॥ ३९॥
तैसें अधिभूतादि आघवे, हें अविद्येचेनि पालवें।
झांकलें तंव मानावें, वेगळें ऐसें ॥ ४०॥
पालवें=पदर पडदा
तेचि अविद्येची जवनिका फिटे, आणि भेदभावाची अवघि तुटे।
मग म्हणों एक होऊनि जरी आटे, तरी काय दोनी होती ॥ ४१॥
जवनिका=पडदा
पैं केशांचा गुंडाळा, वरि ठेविली स्फटिकशिळा।
ते वरि पाहिजे डोळां, तवं भेदिली गमती ॥ ४२॥
पाठीं केश परौते नेले, आणि भेदलेपण काय नेणों जाहालें।
तरि डांक देऊनि सांदिले, शिळेतें काई ॥ ४३॥
ना ते अखंडचि आयती, परि संगें भिन्न गमली होती।
ते सारिलिया मागौती, जैसी कां तैसी।। ४४॥
तेवींचि अहंभावो जाये, तरी ऐक्य तें आधींचि आहे।
हेंचि साचें जेथ होये, तो अधियज्ञु मी ॥ ४५॥
पैं गा आम्हीं तुज, सकळ यज्ञ कर्मज।
सांगीतलें कां जें काज, मनी धरूनि ॥ ४६॥
तो हा सकळ जीवांचा विसांवा, नैष्कर्म्यसुखाचा ठेवा।
परि उघड करूनि पांडव, दाविजत असे ॥ ४७॥
पहिलें वैराग्याइंधनपरिपूर्ती, इंद्रियानळी प्रदीप्तीं।
विषयद्रव्याचिया आहुती, देऊनिया ॥ ४८॥
वैराग्यरूपी इंधन
जमवून
इंद्रियातील अग्नी पेटवून
विषयरूपी
द्रव्याची आहुती
मग वज्रासन तेचि उर्वी, शोधूनि आधारमुद्रा बरवी।
वेदिका रचे मांडवी, शरीराच्या ॥ ४९॥
मग वज्रासन तेचि उर्वी, शोधूनि आधारमुद्रा बरवी।
वेदिका रचे मांडवी, शरीराच्या ॥ ४९॥
उर्वी=यज्ञ भूमीची जमीन वेदिका=यज्ञवेदी
तेथ संयमाग्नीचीं कुंडे, इंद्रियद्रव्याचेनि पवाडें।
यजिजती उदंडे, युक्तिघोषे ॥ ५० ॥
पवाडें=साह्याने युक्तिघोषे= युक्तीरुपी मंत्रघोष
मग मनप्राण आणि संयमु, हाचि हवनसंपदेचा संभ्रमु।
येणें संतोषविजे निर्धूमु, ज्ञानानळु ॥ ५१॥
संभ्रमु=समारंभ
ऐसेनि हें सकळ ज्ञानी समर्पे, मग ज्ञान तें ज्ञेयीं हारपे।
पाठीं ज्ञेयचि स्वरूपें, निखिल उरे ॥ ५२ ॥
तया नांव गा अधियज्ञु, ऐसें बोलिला जंव सर्वज्ञु।
तंव अर्जुन अतिप्राज्ञु, तया पातलें तें ॥ ५३॥
हें जाणोनि म्हणितलें देवें, पार्था परिसतु आहासि बरवें।
या कृष्णाचिया बोलासवें, येरू सुखाचा जाहला ॥ ५४॥
देखा बालकाचिया धणी धाइजे, कां शिष्याचेनि जाहलेपणें होइजे।
हें सद्गुरूचि एकलेनि जाणिजे, कां प्रसवतिया ॥ ५५॥
धणी=तृप्ती धाइजे=तोषणे प्रसवतिया=आई
म्हणोनि सात्विकां भावांची मांदी, कृष्णाआंगीं अर्जुनाआधीं।
न समातसे परी बुद्धी, सांवरूनि देवें ॥ ५६॥
मांदी=समुदाय
मग पिकलिया सुखाचा परिमळु, कीं निवालिया अमृताचा कल्लोळु।
तैसा कोंवळा आणि रसाळु, बोलु बोलिला ॥ ५७॥
म्हणे परिसणेयांच्या राया, आइके बापा धनंजया।
ऐसी जळों सरलिया माया, तेथ जाळितें तेंही जळे ॥ ५८॥
परिसणेयांच्या=ऐकणाऱ्या मधील राजा (सर्वोत्तम)
ॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐ
खुपच छान !
ReplyDelete